नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून

नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभरा खरेदी केंद्रावर पडून

परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवार (ता. २८) पर्यंत नोंदणी केलेल्या १२ हजार ६५ शेतकऱ्यांपैकी १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. वखार महामंडळाकडे साठविण्यासाठी गोदामे नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ लाख ७४ हजार ४०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत.  दरम्यान, बोरी, गंगाखेड, मानवत (जि. परभणी), वसमत (जि. हिंगोली) या ठिकाणच्या केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प आहे. हरभऱ्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ४५०० शेतकऱ्यांनी, परभणी जिल्ह्यातील ३,१६८ शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील ४४०० शेतकऱ्यांनी असे तीन जिल्ह्यात एकूण १२ हजार ६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. साधारणपणे ९ एप्रिलपासून हरभरा खरेदीस सुरवात झाली आहे. पहिल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांतील १,४३२ शेतकऱ्यांचा २१ हजार १७६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात १०३८ शेतकऱ्यांचा १५ हजार ८०० क्विंटल, परभणी जिल्ह्यातील ३१५ शेतक-यांचा ४ हजार २७५ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यातील ७९ शेतकऱ्यांचा १ हजार १०१ क्विंटल हरभऱ्याचा समावेश आहे. आजवर खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा केंद्रावरच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांचे ९ कोटी ३१ हजार ७४ हजार ४०० रुपये एवढ्या रकमेचे चुकारे रखडले आहेत. मानवत (जि. परभणी) येथे विदर्भ को-आॅपरेटिव्‍ह मार्केटिंग फेडरेशनचे खरेद केंद्र कार्यान्वित आहे. परंतु नुकतेच पाथरी (जि. परभणी) येथेही नाफेडचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. पाथरी येथे नोंदणी सुरू असताना मानवत येथील खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे मानवत येथील हरभरा खरेदी बंद आहे. बोरी, गंगाखेड, वसमत येथे साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे हरभरा खरेदी ठप्प आहे. वजन काट्यावरील नोंदी घेण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे चाळण्या तसेच वजन काट्यांची संख्या वाढविता येत नाही. वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहेत. परंतु खरेदी केंद्र एका ठिकाणी तर गोदाम दूर अतंरावरील ठिकाणी आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याच्या कारणांवरून खरेदी यंत्रणेतील सब एजंट संस्था केंद्रावर खरेदी केलेला शेतमाल हलविण्यास तयार नाहीत. त्यामुळे गेल्या वीस दिवसांत या तीन जिल्ह्यांत खरेदी करण्यात आलेला २१ हजार १७६ क्विंटल हरभरा या केंद्रांवरच पडून आहे असे सूत्रांनी सांगितले.  

जिल्हा निहाय नोंदणी केलेले शेतकरी, खरेदी झालेली संख्या, हरभरा खरेदी स्थिती (क्विंटल मध्ये)
जिल्हा नोंदणी खरेदी संख्या हरभरा
नांदेड ४५०० १०३८  १५८००
परभणी ३१६८ ३१५  ४२७५
हिंगोली ४४०० ७९ ११०१          

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com