agriculture news in marathi, Gram repurchase scheme extended deadline doesn't help farmer | Agrowon

हरभरा खरेदीची मुदतवाढही ठरली केवळ नावापुरतीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

अकोला ः अाधारभूत किमतीने राज्यात सुरू असलेली हरभरा खरेदी अखेर बुधवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजेपासून बंद होत अाहे. या हंगामात मार्च महिन्यात हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर एकदा मुदत वाढवून १३ जूनपर्यंत सुरू ठेवण्यात अाली. तरीही अाॅनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी सुमारे ४० टक्केही शेतकऱ्यांचा हरभरा अद्याप खरेदी झालेला नाही. 

अकोला ः अाधारभूत किमतीने राज्यात सुरू असलेली हरभरा खरेदी अखेर बुधवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजेपासून बंद होत अाहे. या हंगामात मार्च महिन्यात हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर एकदा मुदत वाढवून १३ जूनपर्यंत सुरू ठेवण्यात अाली. तरीही अाॅनलाइन नोंदणी केलेल्यांपैकी सुमारे ४० टक्केही शेतकऱ्यांचा हरभरा अद्याप खरेदी झालेला नाही. 

या महिन्यात शासनाने वाढवून दिलेली मुदतही केवळ नावापुरती ठरली असून साठवणुकीसाठी जागा नसणे व बारदान्याअभावी असंख्य केंद्रांवर केवळ दोन ते तीनच दिवस खरेदी सुरू होती. मार्च महिन्यात हरभरा खरेदी सुरू केल्यापासूनच मोजमाप संथगतीने केले जात होते. मेअखेरीस हरभरा खरेदीची मुदत संपल्याने शासनाने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. त्यानंतर १३ जूनपर्यंत खरेदीची मुदत वाढवून मिळाली, परंतु या मुदतवाढीचा फारसा फायदा झाला नाही. पूर्वीप्रमाणेच साठवणुकीसाठी जागा नसल्याने प्रत्येक खरेदी केंद्रावर हजारो पोती पडून होती.

जोपर्यंत हा शेतमाल वेअरहाऊसला जात नाही तोवर केंद्रावर खरेदीसाठी जागा उपलब्ध होणार नव्हती. नेमके हेच झाले. कुठल्याही केंद्रावर नवीन धान्य खरेदीसाठी जागा नसताना भरीसभर म्हणजे बारदाना टंचाईसुद्धा याच काळात उदभवली. 

अाता खरेदी बंद व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना बारदाना उपलब्ध झाला; परंतु संकटांची मालिका कमी व्हायला तयार नव्हती. याच अाठवड्यात सर्वत्र पावसाने हजेरी दिली. त्यामुळे खरेदी बंद राहण्यास हेही एक कारण पुरेशे ठरले. या सर्वच संकटांच्या मालिकेमुळे हरभरा खरेदीचा हंगाम केवळ फार्स ठरल्याची टीका केली जात अाहे.

राहिलेल्यांनी काय करावे?
अाॅनलाइन नोंदणी झालेल्यांपैकी केवळ ४० टक्क्यांच्या अात शेतकऱ्यांचा हरभरा मोजून झाला अाहे. दरम्यान, शासनाने तूर, हरभरा उत्पादकांना क्विंटलला हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली अाहे. या घोषणेनंतर मात्र त्याचा कुठलाही सविस्तर तपशील जाहीर झालेला नाही. परिणामी नोंदणी केलेल्या व विक्री न झालेल्या हरभरा उत्पादकांना हे अनुदान कसे मिळणार याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात अाहेत. शिल्लक राहलेल्या तूर, हरभऱ्याचा पंचनामा होईल की नोंदणी केलेल्यांना क्षेत्रानुसार सरसकट मदत मिळेल हे स्पष्ट नाही. यामुळे गरज असून अनेकांनी विक्री करण्याचे धाडस केलेले नाही. जिल्हास्तरीय यंत्रणांनाही माहिती नसल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे समाधान होताना दिसत नाही.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...