agriculture news in marathi, Gram Sabha now for the pest control handling | Agrowon

कीटकनाशक हाताळणी प्रबोधनासाठी आता ग्रामसभा
संतोष मुंढे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद  : कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, यासाठी आता विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद  : कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना नेमकी कशी काळजी घ्यावी, यासाठी आता विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
या विशेष ग्रामसंभांमधून शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व आदिवासी उपाययोजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी गावातील पात्र लाभधारकांच्या यादीस मान्यताही देण्याचे प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशके फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या दुर्घटनेच्या पार्श्र्वभूमिवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना कीटकनाशके हाताळताना, फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.

१३ ऑक्‍टोबरला कृषी विभागातील सर्व अधिकारी, आरोग्य अधिकारी व सर्व कीटकनाशके बियाणे विक्रेते यांची एकदिवसीय कार्यशाळा औरंगाबादमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना, शेतमजुरांना याविषयी अधिकाधिक जागरूक करण्याचे सूचित केले होते. त्या सूचनेला अनुसरून आता १ नोव्हेंबरला प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन जनजागर करण्यात येणार आहे.

या जनजागरात कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीमुळे होणारे नुकसान व त्यावर आणावयाचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेविषयीही या ग्रामसभेतून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. ग्रामसभांना निरीक्षक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व विभागातील विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.

पंचायत समितीमधील कृषी अधिकारी, वि. अ (कृषी), कृषी विभागाकडील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांनी या सभांमध्ये विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...