agriculture news in Marathi, gram seed fraud case still on board, Maharashtra | Agrowon

तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा विषय संपता संपेना
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वितरित केलेल्या हरभरा बियाणेवाटपात झालेल्या घोळाचा सोक्षमोक्ष लागता लागेना अशी स्थिती समोर अाली अाहे. कृषी खात्याने या अाठवड्यात १३६ कृषी विक्रेत्यांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. यातील मोठे मासे मात्र अद्यापही गळापासून दूरच अाहेत. 

अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वितरित केलेल्या हरभरा बियाणेवाटपात झालेल्या घोळाचा सोक्षमोक्ष लागता लागेना अशी स्थिती समोर अाली अाहे. कृषी खात्याने या अाठवड्यात १३६ कृषी विक्रेत्यांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले. यातील मोठे मासे मात्र अद्यापही गळापासून दूरच अाहेत. 

नेमका काय घोळ झाला, कोण दोषी अाहेत, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई कोण आणि केव्हा करेल, असे विविध प्रश्न पुन्हा उपरोक्त कारवाईने जिल्ह्यात चर्चेत अाले. शिवाय ही थातूरमातूर कारवाई करून घोळाचे प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशा शंकासुद्धा घेतल्या जाऊ लागल्या अाहेत. 
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य) २०१६-१७ अंतर्गत अनुदानित प्रमाणित हरभरा बियाणे वितरित करण्यात अाले होते. यामध्ये लाखोंचा घोळ झाल्याची शंका उपस्थित करीत तेव्हा तक्रारीसुद्धा झाल्या होत्या. त्याची अनेक दिवस कृषी विभागाने चौकशी केली. एक भलामोठा अहवाल बनविला. वरिष्ठांकडेही पाठवला; परंतु त्यावर पुढे कारवाई मात्र झाली नाही.

चौकशी पूर्ण झाल्यानंतर बियाणे वितरणात शासनाची ९९ लाख ४९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात झाला, असा ठपका चाैकशी समितीने अहवालात ठेवलेला अाहे. शासन अंगीभूत असलेल्या कृभकाे (कृषक भारती काे-अाॅप.), राबिनी (राष्ट्रीय बीज निगम) अाणि महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थांनी निष्काळाजीपणा केला, अशा शब्दांत या संस्थांवर चाैकशी अहवालात ताशेरे अाेढण्यात अाले होते. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची याच महिन्यात बीडला बदली झाली. त्यांनी अकोल्यातून जाताजाता कृषी विक्रेत्यांच्या परवाना निलंबन फाइलवर स्वाक्षरी केली व येथून निघून गेले, असे बोलले जाते. मुळात अाता जी कारवाई झाली त्याने या हरभरा घोळातील रकमेबाबत काय साध्य होईल, अशी विचारणा होऊ लागली अाहे. सध्या कुठलाही हंगाम सुरू नसल्याने कृषी विक्रेत्यांना ११ फेब्रुवारी ते १२ मार्च या काळातील निलंबनामुळे किती नुकसान झेलावे लागेल हे कृषी खात्यालाच विचारले पाहिजे, असे जाणकार सूत्रांचे म्हणणे होते.  

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तेव्हा बियाणे पुरवठादार असलेल्या महाबीज, कृभकाे, राबिनी या संस्थांना बियाणे पुरवठा करण्याचा अादेश दिला. मात्र बियाण्यांपासून सामान्य शेतकरीच वंचित राहिल्याचा प्रकार समोर अाला. काहींनी बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री करून उखळ पांढरे करून घेतले. खोटी देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध काहीही झालेले नाही. या प्रकरणात दोषी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाईची गरज असताना केवळ कृषी विक्रेत्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करीत हे प्रकरण थंड बस्त्यात नेण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, अशा शंकाना सुरवात झाली  अाहे.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...