अमरावती विभागात अनुदानावरील हरभरा बियाणे उपलब्ध

हरभरा
हरभरा
अमरावती : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १८,७२८ क्विंटल अनुदानावरील हरभरा बियाणे महाबीज विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी या बियाण्यांची मागणी करावी, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक बी. डी. लुले यांनी केले आहे. 
 
महाबीजकडून राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत या वर्षी रब्बी हंगामाकरिता हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १५ वर्षांआतील संशोधित बियाण्याचा यात समावेश आहे. जाकी, दिग्विजय या वाणाचे अनुदानित दर ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल असून, जाकी वाणाची ३० किलोची बॅग १९५० रुपयांना आहे. दिग्विजय हरभरा वाणाची २० किलोची बॅग १३०० रुपयांना आहे. त्याचप्रमाणे काबुली हरभरा विराट या वाणाचे दर ९५०० रुपये प्रतिक्‍विंटल असून, पाच किलोची बॅग ४७५ प्रमाणे परमीटद्वारे धारण क्षेत्रानुसार २ हेक्‍टरच्या मर्यादेत वितरित होईल. याकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
जिल्हानिहाय बियाणे उपलब्धता (क्विंटल) ः अकोला ः ४०५०, अमरावती ः ४८००, वाशीम ः ३७६३, बुलडाणा ः ३७००, यवतमाळ ः २४१५, एकूण ः १८,७२८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com