अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव ९१५४ क्विंटल बियाणे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बियाण्यांची सार्वत्रिक मागणी होत असल्याने प्रशासनाकडून सुमारे ९१५४ क्विंटल हरभऱ्याचे वाढीव बियाणे पुरवठ्यास मंजुरी मिळाली अाहे. या बियाण्याचे तालुकानिहाय वितरण उद्दीष्ट ठरविण्यात आले अाहे.

जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्प तुडूंब भरलेले अाहेत. रब्बीसाठी प्रकल्पांमधून पाणी मिळण्याची शाश्वती असल्याने शेतकरी पेरणीसाठी पुढाकार घेत अाहेत. यामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र त्यातही हरभरा लागवड अधिक होण्याची चिन्हे अाहेत. कृषी खात्याने रब्बीचे नियोजन केलेले असून सुरवातीला सहा हजार क्विंटल बियाण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात अाले होते. अाता हरभरा बियाण्याची मागणी वाढली असल्याने जिल्ह्याला पुन्हा ९ हजार १५४ क्विंटलचे वाढीव उद्दीष्ट मिळाले. यात शासनाने महाबीजचे ७८८९ क्विंटल बियाणे तसेच राष्ट्रीय बिज निगमचे ८६५ अाणि कृभकोचे ४०० क्विंटल असे मिळून ९१५४ क्विंटल बियाण्यास मंजुरी मिळाली आहे. महाबीज व इतर यंत्रणा हे वाढीव बियाणे पुरविणार अाहेत.

शेतकऱ्यांना बियाणे मिळण्यासाठी महाबीजकडून परमीट दिले जाईल. कृषी सहायकामार्फत हे परमीट प्राप्त करून शेतकरी महाबीजच्या वितरकाकडून बियाणे घ्यावे लागेल. वाढीव नियोजनात अकोला तालुक्याला १६६२, बार्शीटाकळी ४२०, मूर्तिजापूर १५१२, अकोटा २४३९, तेल्हारा २०१५, बाळापूर ६७३, पातूर ४३३ क्विंटल बियाणे पुरविले जाईल अाहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य २०१८-१९ अंतर्गत हे हरभरा प्रमाणित बियाणे मिळणार अाहे. रब्बीत क्षेत्र वाढीची शक्यता पाहता अाता जिल्ह्याला एकूण १५ हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध होत अाहे. या बियाण्यामुळे नियोजित संपूर्ण क्षेत्र लागवडी खाली येऊ शकेल, असे कृषी यंत्रणाकडून सांगण्यात अाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com