अकोला जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
गोपाल हागे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017
 
अकोला : येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात हरभऱ्याची एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी अपेक्षित अाहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ३० हजार हेक्टरने हे क्षेत्र अधिक राहू शकते. रब्बी हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून त्यात हरभरा लागवडीत भरीव वाढ दाखवली अाहे. 
 
 
अकोला : येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात हरभऱ्याची एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी अपेक्षित अाहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ३० हजार हेक्टरने हे क्षेत्र अधिक राहू शकते. रब्बी हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून त्यात हरभरा लागवडीत भरीव वाढ दाखवली अाहे. 
 
या खरीप हंगामात कमी व अनियमित पावसामुळे पिकांची सरासरी ९० टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली होती. १० टक्के क्षेत्र लागवडीखाली येऊ शकले नव्हते. अाता हे क्षेत्र रब्बी पिकाखाली येऊ शकते. शिवाय मूग, उडीद काढणी झालेल्या शेतात व काही शेतकरी सोयाबीनची काढणी करूनही हरभरा व इतर रब्बी पिकांची लागवड करीत असतात. 
 
जिल्ह्यात प्रामुख्याने दरवर्षी हरभऱ्याचे क्षेत्र अधिक असते. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ७० हजार ६०० हेक्टर अाहे. त्यात या वर्षी भरीव वाढ होऊन ते एक लाख २२०० हेक्टरपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे पाण्याची शाश्वती नसल्याने गव्हाचे क्षेत्र ३८,२९० हेक्टरवरून ३१ हजार ३०० हेक्टरपर्यंत घसरण्याची शक्यता अाहे.
 
या हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाणे, रासायनिक खतांचे नियोजन केले अाहे. पुढील अाठवड्यापासून रब्बी पिकांची लागवड सुरू होऊ शकते. सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस झालेला असल्याने रब्बीसाठी तो पोषक ठरणार अाहे. शेतकरी त्याचा लाभ घेण्याच्या तयारीला लागले अाहेत. सोयाबीनच्या सोंगणीने वेग घेतला असून, साधारणतः अागामी १५ ते २० दिवसांत रब्बी पेरण्याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झालेले असेल.  
 
जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र (हेक्टर)
पीक सरासरी क्षेत्र संभाव्य क्षेत्र 
रब्बी ज्वारी
१४६ १४३०
मका ३२० ४००
गहू ३८,९२० ३१,३००
हरभरा ७०,६०० १,०२,२००

 

 

 

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...