agriculture news in marathi, gram sowing status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात हरभऱ्याची साडेसत्तावीस हजार हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच दरातील स्थिरता यामुळे सातारा जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून सर्वसाधारण क्षेत्राइतक्‍या क्षेत्रावर लागवड होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात या रब्बी हंगामात हरभऱ्याची २७ हजार ५५१ हेक्‍टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक क्षेत्र कोरेगाव तालुक्‍यात आहे.

सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच दरातील स्थिरता यामुळे सातारा जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून सर्वसाधारण क्षेत्राइतक्‍या क्षेत्रावर लागवड होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात या रब्बी हंगामात हरभऱ्याची २७ हजार ५५१ हेक्‍टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक क्षेत्र कोरेगाव तालुक्‍यात आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू व हरभरा ही प्रमुख पिके आहेत. हरभऱ्याच्या उत्पादना एवढाच बिवड उपयुक्त असल्याने हरभरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार १८७ हेक्‍टर आहे. यापैकी मागील सप्ताहापर्यंत २७ हजार ५५१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या दुष्काळी तालुक्‍याचा प्रमुख हंगाम असला तरी रब्बी हंगामात सर्वच तालुक्‍यांत हरभरा पिक घेतले जाते. कमी पाण्यात आणि थंडीवर हरभऱ्याची वाढ होत असते. आले उत्पादक शेतकरी आले लागवड करण्यापूर्वी हरभरा घेण्यास पंसती देतात. कोरेगाव तालुक्‍यात आले पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने याच तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

कोरेगावसह सातारा, जावली, खटाव, माण व फलटण या तालुक्‍यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या हरभऱ्याची वाढ चांगली असून, तो फुलोऱ्यात आला आहे. हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून हरभऱ्यास प्राधान्य देत आहेत.

तालुकानिहाय हरभरा लागवड (हेक्‍टर)

तालुका क्षेत्र
सातारा ३३६७
जावली १३७५
पाटण २११३
कऱ्हाड ३३७७
खटाव ३७४६
कोरेगाव ५८३५
माण २०५०
फलटण १९३४
खंडाळा १५०४
वाई २१९०
महाबळेश्वर ६०

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...