agriculture news in marathi, gram sowing will increase by one lakh hectare | Agrowon

एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणार
मनोज कापडे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

हरभरा उत्पादनवाढीसाठी कृषी विभागांतर्गत मोहीम राबविली जाईल. शासनाचा स्वतंत्र निधी मिळण्याबाबत आयुक्तालयास्तरावरून चाचपणी केली जाईल.
- डॉ. एस. जाधव, कृषी विस्तार संचालक

पुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा किमान एक लाख हेक्टरने वाढविण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून देखील हरभऱ्याखालील क्षेत्र वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांनी रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा नुकताच घेतला. राज्यात हरभरा उत्पादनवाढीसाठी अतिशय अनुकूल स्थिती असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामाचा एकूण पेरादेखील वाढण्याची चिन्हे आहेत, असे आढाव्याच्या वेळी सांगण्यात आले.

कृषी विस्तार संचालक डॉ. एस. जाधव यांनी सांगितले, की ''गेल्या हंगामात राज्यात हरभऱ्याचा पेरा १८.९५ लाख हेक्टरवर झाला होता. यंदा सर्वत्र चांगला पाऊस असून ऑक्टोबरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पेरा २० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्यासह नगर, सोलापूरचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

प्रचारप्रसार केला जाणार
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हरभऱ्याकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या मोहिमेत तीन मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. त्यात अनुदानित बियाण्याचे वाटप, पीक प्रात्यक्षिके आणि पीक संरक्षणविषयक उपायासाठी मार्गदर्शन अशा तीन स्तरांवर नियोजन केले जाणार आहे. बीजप्रक्रिया करून पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असावा यासाठी प्रचारप्रसार करण्याचे कृषी आयुक्तालयाने ठरविले आहे.

पेरा वाढण्यासाठी अनुकूलता
'हरभरा पिकाकडे यंदा शेतकरीदेखील वळतील. दर्जेदार वाणांची उपलब्धता, बाजारभाव, संरक्षित पाण्याची चांगली स्थिती आणि मॉन्सूनचा दिलासादायक प्रवास या सर्व बाबी पेरा वाढण्यासाठी अनुकूल आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडापासून राज्यात हरभरा पेरण्यास सुरवात होईल. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरा चालू राहील, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...