agriculture news in marathi, Gramdavit Siddheshwar Yatra start from Friday | Agrowon

ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेला शुक्रवारपासून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

सोलापूर  : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना शुक्रवारी (ता. १२) ६८ लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून सुरवात होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मंगळवारी (ता.९) पत्रकार परिषदेत दिली. यंदाही यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर  : ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना शुक्रवारी (ता. १२) ६८ लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करून सुरवात होणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मंगळवारी (ता.९) पत्रकार परिषदेत दिली. यंदाही यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

होम मैदानावरील यात्रेत २१० स्टॉल असणार आहेत. खेळणी आणि खाद्य पदार्थांच्या स्टॉलसोबतच यंदा डिस्ने लॅण्ड हे आकर्षण ठरणार आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून १० ते ३१ जानेवारी कालावधीसाठी संमती कट्टा, होम मैदान, सिद्धेश्‍वर मंदिर, पंचकट्टा या परिसरासाठी एक कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. आकाशवाणीसह विविध वाहिन्यांवरून यात्रेतील अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होईल.

शुक्रवारी (ता. १२) सकाळी आठ वाजता परंपरेप्रमाणे श्री मल्लिकार्जुन मठाजवळील हिरेहब्बू मठातून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदिध्वजांची आणि पालखीची मिरवणूक सुरू होईल. ही मिरवणूक नियोजित मार्गाने श्री सिद्धेश्‍वर मंदिरात जाईल. तेथून दुपारी एक वाजता पुन्हा मिरवणूक सुरू होऊन ६८ लिंगांना तैलाभिषेक करून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात येईल. शनिवारी (ता.१३) अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर होणार आहे. तत्पूर्वी सकाळी सात वाजता हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ होऊन दुपारी एक वाजता ही मिरवणूक श्री सिद्धेश्‍वर मंदिरात येईल.

यानंतर अक्षता सोहळा होईल. या सोहळ्यानंतर ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी नंदीध्वज मिरवणुकीने मार्गस्थ होतील. रविवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता हिरेहब्बू वाड्यातून होमप्रदीपन सोहळ्यासाठी नंदिध्वजांची मिरवणूक सुरू होईल. रात्री १० वाजता होम मैदानावरील होम कुंडाजवळ पोचतील. सोमवारी (ता. १५) होम मैदानावर यात्रेत रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम होणार आहे. यानंतर रात्री ११ वाजता श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून त्या दिवसाच्या धार्मिक विधींची सांगता होणार आहे.
 

पशु आणि कृषिप्रदर्शन
यात्रेनिमित्त विजापूर रस्त्यावरील श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिर परिसरात पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांसाठी स्वस्तामध्ये भाजी-भाकरी उपलब्ध केली आहे. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत यात्रेत होम मैदानावर कृषी प्रदर्शन भरणार आहे. या निमित्ताने कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही होणार आहे. २०० स्टॉल्स यामध्ये आहेत. शेतीविषयक विविध तंत्रज्ञान आणि नवनवीन महिती याठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

होम मैदानावरील आपत्कालीन रस्त्याचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. सुवर्ण सिद्धेश्‍वर मंदिरासाठी ४ कोटी ९० लाख रुपये, ४५० किलो चांदी, ९५० ग्रॅम सोने भाविकांकडून आले आहे. मंदिरासमोरील सभामंडपाचे काम चालू आहे. सभामंडपाखाली ध्यान मंदिर बांधण्यात येत आहे. होम मैदानावरील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज पाण्याचा सडा मारण्यात येईल.

- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्‍वर देवस्थान पंचकमिटी

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...