agriculture news in marathi, Grampanchayat computer operator in crises due to salary unpayed | Agrowon

ग्रामपंचायत संगणकचालक वेतनाअभावी अडचणीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

अकोला : काम करूनही महिनोमहिने मानधन मिळत नसल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये परिचालक म्हणून काम करीत असलेले कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता थकीत मानधन व इतर मागण्यांसंदर्भात अकोला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अकोला : काम करूनही महिनोमहिने मानधन मिळत नसल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये परिचालक म्हणून काम करीत असलेले कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता थकीत मानधन व इतर मागण्यांसंदर्भात अकोला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील काही संगणक परिचालकांचे माहे डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत सीएसपीव्ही या कंपनीला शासनाने पैसे देऊनसुद्धा मानधन दिले गेलेले नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी मानधान झाले; परंतु दोनशे, पाचशे, हजार, दीड हजार अशा स्वरूपात मानधन देण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार संगणकचालकाला ६००० रुपये मासिक मानधान देणे गरजेचे आहे. असे असूनसुद्धा कंपनी त्यामध्ये कपात करीत आहे. कंपनीला प्रत्येक ग्रामपांचायत केंद्रामधून दरमहा १२४०० रुपये कपात केली जाते. परंतु संगणकचालकाला ते मानधन ६ ते ७ महिने विलंबाने दिले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून कॉम्प्युटर, प्रिन्टर दुरुस्तीसाठी व टोनर आणि कागद रिमकरिता ग्रामंपचायतीमार्फत कंपनीला निधी पाठविला जातो, परंतु डिसेंबर २०१७ पासून एकाही ग्रामपंचायतीचे कॉम्प्युटर स्पेअर पार्ट किंवा दुरस्ती अजूनसुद्धा करून दिले गेले नसल्याचा आरोप या संगणकचालकांच्या संघटनेने केला आहे.

कंपनीकडून पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवर सर्व सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सरपंच, ग्रामसेवक व ऑपरेटर यांची संयुक्त कार्यशाळा घेण्याची शासनाने ही जबाबदारी कंपनीला दिली होती. परंतु तालुका स्तरावर आजपर्यंत एकही प्रशिक्षण झाले नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शासन निर्णयानुसार सेवा केंद्रामध्ये वीज व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये ती सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नसल्याची बाबही मांडली. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरुवार (ता. ८) पासून काम बंद आदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अविनाश मातळे व उपाध्यक्ष अतुल आबुलकर यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...