अकोला जिल्ह्यात १७ सरपंच, ७७७ सदस्य बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक
अकोला  : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात एेन हंगामात ‘शिमगा’ सुरू झालेला अाहे. २७२ ग्रामपंचायतींसाठी येत्या ७ अाॅक्टोबरला मतदान होत असून, पहिल्यांदाच सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने अधिक चुरस अाहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली असून, अाढावा घेतला असता १७ गावांचे सरपंच बिनविरोध निवडले गेले अाहेत. तसेच ७७७ उमेदवारांविरोधात एकही अर्ज आला नसल्याने हे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले.
 
अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींची पुढील महिन्यात मुदत संपणार असल्याने सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या अाहेत. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अाता लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले. जिल्‍ह्यातील निवडणूक होत असलेल्या १७ गावांमध्ये सरपंचपदाची बिनविरोध निवड झाली. यामुळे अागामी काळात होणारी राजकीय अोढाताण मोठ्या प्रमाणात थांबली. जिल्ह्यात अकोला, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, अकोट अाणि बार्शीटाकळी या सात तालुक्यांत २७२ ग्रामपंचायतींत निवडणुका होत अाहेत. 
 
पहिल्यांदाच सरपंच हा जनतेतून निवडला जाणार अाहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत सर्वांमध्ये चुरस वाढली अाहे. अर्जप्रक्रिया अाटोपली असून, उमेदवारी मागे घेण्याची मुदतही संपली. त्यानंतर अाढावा घेतला असता १७ गावांमधील सरपंच बिनविरोध निवडून आले. यात अकोला तालुक्यातील कोठारी, सुकोडा, बार्शीटाकळीमध्ये खेर्डा; अकोट तालुक्यात टाकळी खुर्द, लामकाणी, दिवठाणा, रोहणखेड; तेल्हाऱ्यात वरुड वडनेर, भिली; मूर्तिजापूर तालुक्यात हिवरा कोरडे; बाळापूर तालुक्यातील मांडवा, निंबी, मोरगाव सादीजन अाणि पातूर तालुक्यातील शेकापूर, बोडखा, तांदळी खुर्द व अासोला गावांचा समावेश अाहे.
 
अाता २७२ पैकी २५५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी थेट मतदान घेतले जाईल. जिल्हातील २ हजार ११८ ग्रामपंचायत सदस्य पदांपैकी ७७७ उमेदवारांची सदस्यपदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आल्याने एक हजार ३४१ सदस्यपदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार अाहे. 
 
बिनविरोध झालेले ग्रामपंचायत सदस्य :- मूर्तिजापूर १७४, बार्शीटाकळी १५५, अकोला १४३, तेल्हारा ९५, अकोट ८७, पातूर ७३ , बाळापूर ५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com