मराठवाड्यात अठराशे ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद/ परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील १८३२ ग्रामपंचायतींसाठी येत्या ७ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या तारखेनंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यामध्ये १८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ५२०८; तर एकूण १६६४७ सदस्यपदांसाठी ३० हजार ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये बीड जिल्हा आघाडीवर असून, सरपंच व सदस्यपदासाठी बीडमध्ये उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील २१३, जालना जिल्ह्यातील २३२, परभणी जिल्ह्यातील १२६, हिंगोली जिल्ह्यातील ४९, नांदेड जिल्ह्यातील १७१, बीड जिल्ह्यातील ६९०; तर लातूर जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींसाठी ७ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातून सरपंचपदासाठी ६१२, जालन्यातून ६८८, परभणीतून ३३४, हिंगोलीतून १४६, नांदेडमधून ४१६, बीडमधून १९७८, लातूरमधून १०३४  उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आहे.

दुसरीकडे सदस्यपदासाठी औरंगाबादमधून ३४२०, जालन्यातून ३५७२, हिंगोलीमधून ६९०, नांदेडमधून २०४०, बीडमधून सर्वाधिक १२०१५; तर लातूरमधून ६२६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. २७ सप्टेबर या अर्ज मागे घेण्याच्या तारखेपूर्वी मराठवाड्यातील १८३२ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासाठी ९१९२; तर सदस्यपदासाठी ४१५३७ मिळून ५० हजार ७२९ उमेदवारांचे अर्ज कायम होते.

प्रत्यक्ष माघारीची मुदत संपल्यानंतर मात्र संपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ५२०८; तर १६६४७ सदस्यपदांसाठी तब्बल ३० हजार ३४ उमेदवार आपले नशीब निवडणुकीच्या रिंगणात आजमावीत आहेत.

परभणीत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी परभणी जिल्ह्यातील शनिवारी (ता.७) मतदान होणाऱ्या १२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी ३२३ आणि सदस्यपदांसाठी २,०४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.९ ग्रामपंचायती़ंच्या सरपंचाची तर पूर्णा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाली आहे. सदस्यांच्या १२८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

शेवटचे पाच दिवस उरल्यामुळे निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सध्या शेतकरी, शेमजूर सकाळी लवकरच शेतावर जात आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांना शेतावर जाऊन मतदारांची मनधरणी करावी लागत आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com