सोलापूर जिल्ह्यातील ६६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ऑक्‍टोबर २०१९ ते डिसेंबर २०२० कालावधीत जिल्ह्यातील ६६२ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारीला सुरवात केली आहे. या गावांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मागितली आहे. 

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेली प्रभागरचना करून ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने माहिती मागविण्यात आली आहे. गावांची लोकसंख्या, मुदत पूर्ण होत असलेला कालावधी यासह इतर माहिती मागविण्यात आली आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती या निवडणुकीला सामोरे जात असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही या निवडणुकांची चोख तयारी करण्यात येत आहे. 

मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, महाळुंग, वैराग, वडाळा, बोरामणी, अनगर, मोडनिंब, करकंब, भोसे, नागणसूर, नान्नज, कुर्डू, भाळवणी, कासेगाव, कडलास, कोळा, शेटफळ, आष्टी, कुरूल, पेनूर, मांडवे, फोंडशिरस, वागदरी, महूद या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनगरचे सरपंचपद सर्वसाधारण, अकलूज सर्वसाधारण महिला, नातेपुते ओबीसी, वैराग अनुसूचित जाती महिला आणि मोडनिंब येथील सरपंचपद सर्वसाधारण आहे. या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने यासह इतर मोठ्या गावांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com