agriculture news in marathi, grampanchayats participate in swach gaon scheme, pune, maharashtra | Agrowon

स्वच्छ गाव, स्वच्छ तालुका योजनेत पुण्यातील ९९२ ग्रामपंचायतींचा सहभाग
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

योजनेत पारितोषिक मिळणाऱ्या ग्रामपंचायती व तालुके जिल्ह्याचे स्वच्छतेतील प्रतिनिधित्व करतील. यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीला व तालुक्याला स्वच्छता गुणानुक्रमांक मिळेल. त्यामुळे स्वच्छताविषयक कामांतील गती व स्थिती सुधारण्यास मदत होईल.
- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

पुणे   : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ गाव व स्वच्छ तालुका पारितोषिक’ योजनेत जिल्ह्यातील ९९२ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. जिल्हा परिषदेने ऑनलाइन स्वरूपात एखाद्या योजनेत सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया प्रथमच केली असून, यामध्ये वेल्हा, खेड, पुरंदर व आंबेगावमधून उत्तम प्रतिसाद लाभला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिली.

अध्यक्ष देवकाते म्हणाले, की राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या स्वच्छ भारत मिशन तसेच राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात गाव स्तरावर स्वच्छतेविषयक कामे सुरू आहेत. सुरू असलेल्या कामांना अधिक गती मिळण्यासाठी, जिल्ह्यातील स्वच्छतेचा दर्जा वाढण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात प्रत्येक तालुक्यातून ३ ग्रामपंचायती व जिल्ह्यातील तीन पंचायत समितींची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समित्यांचे सभापती, गटविकास अधिकारी यांना जिल्हा स्तरावर प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

१० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अंमलबजावणी व केलेल्या कामांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. योजनेत वैयक्तिक शौचालयाबाबत केलेले काम, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, एका शोषखड्डा शौचालयाचे दोन शोषखड्ड्यांच्या शौचालयात रूपांतर, वैयक्तिक शोषखड्ड्यांचे बांधकाम, सार्वजनिक स्वच्छता, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, प्रचार प्रसिद्धी, गावातील लोकसहभाग यासाठी गुणांची विभागणी करून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ग्रामपंचायती व तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...
पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून...मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना...
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री...
सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष...पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...