agriculture news in marathi, Gramsevak rejects to work form Horticulture scheme in MREGS | Agrowon

फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. २२) चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवक संघटनेने या योजनेवर बहिष्कार टाकल्याचे या वेळी सांगण्यात आले.

चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेवर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. २२) चिपळूण तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवक संघटनेने या योजनेवर बहिष्कार टाकल्याचे या वेळी सांगण्यात आले.

ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप कदम म्हणाले, की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची कामे कृषी विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. तरीही जिल्हा परिषद स्तरावरून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांवर फळबाग लागवडीची कामे जबरदस्तीने लादली जातात, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी फळबाग लागवड कामास विरोध करून त्यावर बहिष्कार टाकला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी विविध वैयक्तिक तसेच सार्वजनिक लाभाची कामे केली जातात. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात फळबाग लागवडीवर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीची मुख्य जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागावर सोपवण्यात आली आहे. तसा शासन निर्णयदेखील यापूर्वी पारित झाला आहे. फळबाग लागवडीबाबत स्पष्ट शासन निर्णय असताना ही कामे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांवर जबरदस्तीने लादली जात आहेत.

प्रत्येक गावात हेक्‍टरी प्रमाणात फळबाग लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. मुळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शासकीय योजना राबवल्या जातात. शासनाने एखादी नवीन योजना जाहीर केल्यास प्रथमतः ती ग्रामपंचायतीवर लादली जाते. शासन निर्णयात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी नसली तरी त्यांना योजनेच्या अंमलबजावणीत जबरदस्तीने गोवले जाते. गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीची कामे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी राबवीत आहेत. योजनेच्या अंमलबजावणीत उद्दिष्टपूर्ती न झालेल्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मुळात जबाबदारी नसतानाही काम करूनही कारवाईला सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...