agriculture news in marathi, grant for onion producers, pune, maharashtra | Agrowon

नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे कांदा अनुदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या अडीच महिन्यांच्या कालावधीत कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ९२ हजार ८४७  शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार २०० अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना साडेचाळीस कोटींचे अनुदान मिळणार आहे. अजूनही ३४ हजार २३२ अर्जांची छाननी बाकी आहे. त्यामुळे हा आकडा ६० कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. 

नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या अडीच महिन्यांच्या कालावधीत कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ९२ हजार ८४७  शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार २०० अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना साडेचाळीस कोटींचे अनुदान मिळणार आहे. अजूनही ३४ हजार २३२ अर्जांची छाननी बाकी आहे. त्यामुळे हा आकडा ६० कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. 

नोव्हेंबर २०१८ पासून कांद्याच्या भावात अचानक घसरण झाल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दीड महिन्यांच्या कालावधीत कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना अनुदान देण्यात दिले. त्यानंतरही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही. त्यामुळे १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा झाला.

या दरम्यान जिल्ह्यातील दोन लाख ५१ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ४२ लाख दोन हजार ८६९ क्विंटल कांदाविक्री केला आहे. यापैकी ९२ हजार ८४७ शेतकऱ्यांनी कांद्याच्या अनुदानासाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५९ हजार ५१९ अर्जांची छाननी झाली. त्यात ५७ हजार २०० अर्ज पात्र ठरले. त्यातील ३४ हजार २३२ अर्जांची छाननी होणे बाकी आहे. या पात्र लाभार्थींनी२० लाख ४१ हजार ४०७ क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. या लाभार्थींना ४० कोटी ४९ लाख ८१ हजार ६५८ अनुदान मिळणार आहे. सुमारे ३४ हजार २३२ अर्जांची छाननी बाकी असल्यामुळे कांद्याच्या अनुदानाचा आकडा ६० कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. 
 
कांदा अनुदानाबाबत स्थिती 

  • लाभधारक शेतकरी ः २,५१,५९१
  • आवक क्विंटलमध्ये ः ४,२०,२८६९ 
  • बाजार समित्यांना प्राप्त अर्ज ः९२,८४७
  • लेखापरीक्षकांनी तपासणी केलेले अर्ज ः ५९,५१९
  • छाननी बाकी असलेले अर्ज ः ३४,२३२ 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...