agriculture news in marathi, grant sanction for agriculture machanization scheme, akola, maharashtra | Agrowon

अकोल्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी पावणेतीन कोटींचे अनुदान जमा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018
अकोला  ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातून कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देत अाहे. मात्र या योजनेतून अनेक महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत अाले होते. याबाबत शुक्रवारी (ता. ११) ‘अॅग्रोवन’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यात सुमारे पावणेतीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. 
 
अकोला  ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातून कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देत अाहे. मात्र या योजनेतून अनेक महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत अाले होते. याबाबत शुक्रवारी (ता. ११) ‘अॅग्रोवन’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यात सुमारे पावणेतीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. 
 
कृषी यांत्रिकिकरण योजनेअंतर्गत या वर्षातील लाभार्थी निवडण्यासाठी नव्याने अर्जप्रक्रिया राबवली जात अाहे. कृषी विभागाने यंत्रांसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्याचे अावाहन केले अाहे. एकीकडे ही प्रक्रिया राबवली जात असताना दुसरीकडे मात्र जुने अनुदान मिळत नव्हते. शेतकरी वारंवार कृषी कार्यालयात जाऊन अनुदानाबाबत सातत्याने विचारणा करीत होते.
 
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना रोटाव्हेटर, मळणीयंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, डाळमील, कपाशी श्रेडर, कल्टीवेटर, पॉवर विडर, पाइल, पंप संच अशा प्रकारचे विविध यंत्र घेण्याची मुभा अाहे. शेतकऱ्यांना त्याच्या गरजेनुसार हवे असलेले यंत्र घेण्यासाठी शासनाकडे अाॅनलाइन अर्ज दाखल करावा लागतो. योजनेतून ट्रॅक्टरसारखे मोठे यंत्र घेतलेल्या शेतकऱ्यांना एक ते सव्वा लाखापर्यंत अनुदान मिळते. तर इतर यंत्रांना त्यांच्या किमती व निकषानुसार अनुदान देय अाहे.
 
अकोला जिल्ह्यात सुमारे ६०० ट्रॅक्टर व इतर यंत्रे वाटप झालेली अाहेत.  यंत्र खरेदी केलेल्या शेतकऱ्यांसाठी पावणेतीन कोटी रुपये अनुदान प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अाहे. यापैकी अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे थकलेले अनुदान दोन कोटी ३७ हजार रुपये खात्यात जमा झाले. जिल्ह्यात दोन कोटी ७५ लाख रुपये अनुदान मार्चनंतर मिळाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...