मागासवर्गीय शेतकऱ्यांना सिंचनासाठी २३६ कोटी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : विहीर खोदाईसह सिंचनांच्या विविध साधनांकरिता राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी यंदा २३६ कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत.

या योजनेतून यंदा किमान सहा हजार नव्या विहिरींची खोदाई होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात पाच हजार नव्या विहिरी झालेल्या आहेत. अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध शेतकऱ्यांना नव्या विहीर खोदाईला अडीच लाख तर विहीर दुरुस्तीला ५० हजारांपर्यंत अनुदान मिळेल. याशिवाय शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदासाठी एक लाख, पीव्हीसी पाइपला ३० हजार वीज कनेक्शनला दहा हजार रुपये अनुदान मिळेल.

‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून मागासवर्गीय गटातील शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीतून विकास साधण्याचा हेतू आहे. त्यासाठी उपलब्ध झालेल्या अनुदानाचे वाटप डीबीटीने थेट बॅंक खात्यात होईल,’’ असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

राज्य शासनाने त्यासाठी www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दहा ऑगस्टपासून अर्ज स्वीकारणी सुरू केली आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दीड लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र, जात वैधता दाखला तसेच सातबारा व आठ 'अ'चा उतारा ऑनलाइन अर्ज करताना द्यावा लागेल, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com