agriculture news in Marathi, grape farming in problem due to drought, Maharashtra | Agrowon

द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहण
अभिजित डाके
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टॅंकरने पाणी देऊन द्राक्ष बागा जगवल्या आहेत. मात्र, आता पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. माझी विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे बागेला पाणी कसे आणायचे असा प्रश्‍न पडला आहे.
- सुनील हसबे, शेतकरी, हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली.

सांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय...द्राक्ष बागंला टॅंकरन पाणी घालतुया... विहिरीबी कोरड्या हायत्या... जमिनीतील पाण्याची पातळी ६०० ते १२०० फुटापर्यंत खालावल्या हायत्या... प्यायला पाणी नाय तर बागला कुठणं आणायच... पीककर्ज काढलया... झाड जगवायसाठीच टॅंकरनं पाणी द्यावं लागतय तर उत्पन्न मिळणं दूरच... त्यामुळं अन्‌ कर्ज कसं फेडायचं असं पळशी (ता. खानापूर) येथील शेतकरी सांगत होते. 

पाणीटंचाईच्या निमित्तानं खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, आणि जत तालुक्‍यांचा दौरा केला. चौका चौकात शेतकरी बसून होते. पाऊस तर गेला. आता करायचं काय? अशा चर्चा शेतकरी करत होते. ‘‘ताकारी, टेंभूचं पाणी चार पाच मैलावर आलंया...पण तिथनं पाणी टॅंकरन आणल्याशिवाय पर्याय न्हाय बघा...पण डिझेलचे दर वाढल्याती त्यामुळं टॅंकरबी महाग बसतूया,’’ असा संवाद अमित गुरव आणि पंकज पिसे यांच्यात सुरू होता. यंदा हवामान खात्यानं चांगला पाऊस पडलं असं अंदाज व्यक्त केला होता. पण पाऊस पडलाच नाही. 

दुष्काळीपट्ट्यात परतीचा पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांना थोडेतरी पाणी मिळते. पण यंदा परतीचा पाऊस न बरसताच निघून गेला. यामुळं द्राक्ष पट्ट्यात फळ छाटण्याच थांबल्या. प्रत्येक ठिकाणी पाणी कसे आणायचे याचे शेतकरी नियोजन करत होते. जवळपास कुठंच पाणी नव्हतं. पंधरा ते वीस किलोमीटरवर पाणी होत. पण, ते पाणी आणण्यासाठी गेल्या वर्षीपेक्षा टॅंकरमागे ३०० ते ५०० रुपये अधिक मोजावे लागणार असल्याने आर्थिक पडवरणारे नव्हते. गेल्या वर्षी २५०० ते २७०० प्रतिटॅंकर असा दर होता. तर यंदा ३००० रुपये प्रतिटॅंकर दर आहेत.

जत तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी टॅंकर दुरुस्ती करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसले. टॅंकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ३० ते ५० किलोमीटरच्या परिसरात पाणीच नाही. जत तालुक्‍यातील शेतकरी उजनी किंवा कर्नाटकातील भीमा नदी पाणी आहे, त्याठिकाणाहून पाणी आणण्यासाठी जाणार आहेत. या भागातील लोकांनी पाणी दिलं तरच पाणी, अन्यथा स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. त्या वेळी कुठून ना कुठून तरी पाणी उपलब्ध होत होत. मात्र, यंदा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आता ३० ते ५० किलोमीटरच्या परिसरात पाणी नाही. पुढील परिस्थिती खूप वाईट आहे.

खानापूर, तासगाव, जत तालुक्‍यांत गेल्या चार ते पाच वर्षांपासून अपेक्षित पाऊसच झालेला नाही. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर ६०० फूट बोअर घेऊनदेखील पाणी लागत नाही. तर जत तालुक्‍यात १२०० ते १३०० फूट खोल बोअर घेतली तरीही नुसताच मातीचा फुफाटा शेतकऱ्यांच्या नशिबी आहे. 

द्राक्ष हंगामातील एकरी अंदाजे खर्च

  • हंगाम १५० दिवस
  • त्यापैकी ७५ दिवस टॅंकरने पाणी द्यावे लागते
  • प्रतिटॅंकर ३ हजार रुपये प्रमाणे प्रतिदिनी एक टॅंकर 
  • ७५ दिवसांचे २ लाख २५ हजार
  • कीडनाशके, खते आणि मजुरी दोन ते अडीच लाख
  • असा एकूण सव्वा चार लाख ते चार लाख ७५ हजार अंदाजे

प्रतिक्रिया
आमच्या गावातील पाण्याची पातळी ६०० फुटापेक्षा खाली गेली आहे. दुष्काळाच्या चक्रातून संपण्याची भीती निमार्ण झाली आहे. नवीन उद्योग करू शकत नाही.
- अमित गुरव, शेतकरी, पळशी, ता. खानापूर, जि. सांगली.

बागेला टॅंकरने पाणी देण्याची माझी ऐपत नसल्याने मी बाग धरली नाही. त्यामुळे जगणे मुश्‍कील झाले आहे, बॅंकेचा हप्ता ही भरू शकत नाही.
- मनोहर थोरात, शेतकरी, झरे, ता. आटपाडी, जि. सांगली.

सन २०१५ चा दुष्काळापेक्षा सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तीस किलोमीटर परिसरात पाणी नाही. पुढील परिस्थिती खूप वाईट आहे. शासनाने म्हैसाळंच पाणी सोडावं. तर लोक जगू शकतील.
- विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत, जि. सांगली.
 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...