agriculture news in marathi, Grape trader cheats farmers for seven crore | Agrowon

द्राक्ष व्यापाऱ्याकडून ७ कोटींना गंडा
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

अंबासन, जि. नाशिक ः सटाणा व मालेगाव परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिल्लीच्या आझादपूर येथील रोहितकुमार ॲन्ड जतिनकुमार या व्यापाऱ्याने सात कोटींवर रकमेची फसवणूक करून गंडा घातला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’, अशी गत झाली आहे. 

अंबासन, जि. नाशिक ः सटाणा व मालेगाव परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिल्लीच्या आझादपूर येथील रोहितकुमार ॲन्ड जतिनकुमार या व्यापाऱ्याने सात कोटींवर रकमेची फसवणूक करून गंडा घातला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’, अशी गत झाली आहे. 

नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत सटाणा व मालेगाव परिसरातील शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्लीतील आझादपूर फळबाजार समितीतील आर. जे. सी. या व्यापाऱ्याला द्राक्ष एका ट्रान्स्पोर्टमार्फत पोच केले. सुरवातीला या व्यापाऱ्याने वेळेत पैसे अदा करून शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यामुळे पुढील पैसेही मिळतील, या आशेवर शेकडो शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री केले. मात्र आजतागायत या व्यापाऱ्याने एकाही शेतकऱ्याचे पैसे न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. 

गुरुवारी (ता. २१) निवडक द्राक्ष उत्पादकांनी दिल्ली गाठत तेथील फळबाजार समितीचे सचिव गोयल यांची भेट घेतली असता, संबंधित व्यापाऱ्यावर परवाना रद्द व आडत सील करू शकतो, यावर काहीही करू शकत नसल्याने न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेत पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन दिले. रविवारी (ता. २४) शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नळकस (ता. बागलाण) येथे जमा होत तीन ते चार तास चर्चा केली. चर्चेअखेरीस व्यापाऱ्याकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न मिळाल्याने त्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निश्‍चित केले. शिवारखरेदी योजनेतून शेतकऱ्यांमध्ये पुन्हा जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.  

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...