द्राक्ष उत्पादकांपुढे चवीसह 'मार्केटिंग'चे आव्हान

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार) ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी, पुणे येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील.
द्राक्ष
द्राक्ष

नाशिक : मागील दोन वर्षांत भारतीय द्राक्षे चिलीच्या द्राक्षांच्या तुलनेत रेसीड्यू, टिकाऊपणा या बाबतीत सरस ठरली. मात्र तरीही गोड चवीच्या निकषावर मात्र मागे असल्याचेच चित्र होते. येत्या काळात गोड चवीबरोबरच जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन घेतले, तर भारतीय द्राक्षांना उज्ज्वल भवितव्य राहणार, असे जाणकारांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून राज्यातील द्राक्ष उत्पादक नैसर्गिक आपत्तीशी झुंजत आहेत. २०१६-१७ हे वर्ष सर्वाधिक आव्हानात्मक ठरले. मुख्य हंगाम सुरू झाल्यानंतर युरोपसह देशांतर्गत बाजारात द्राक्षांना मोठा फटका बसला. बहुतांश द्राक्ष उत्पादकांना खर्च निघेल इतकाही दर मिळाला नाही. जगभरातील द्राक्ष बाजारात आवक वाढल्यामुळे त्याचा फटका बसला. मात्र त्या सोबतच ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा चवीची द्राक्षे बाजारात न पोचल्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम झाला. गतवर्षीच्या नुकसानीची विविध कारणे समोर आली असून, त्यातील "बाजाराचे अव्यवस्थापन'' हे प्रमुख कारण असल्याबाबत जाणकारांचे एकमत झाले आहे. मागील २५ वर्षांत द्राक्षाचे उत्पादन, कीड-रोग नियंत्रण, यांत्रिकीकरण यात क्रांतिकारक स्वरूपाचे काम द्राक्ष उत्पादकांनी केले आहे. आता मार्केटिंगचे मुख्य आव्हान द्राक्षशेतीसमोर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. द्राक्षशेतीपुढील आव्हाने 

  • वातावरणातील बदल
  • बनावट कृषिनिविष्ठा
  • स्पर्धक्षम वाणांचा तुटवडा
  • असुरक्षित बाजार व्यवस्था मजूरटंचाई
  • द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या

  • बनावट बायोलॉजिकल उत्पादनांच्या निर्मितीवर बंदी घाला  
  • फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी करा.  
  • देशांतर्गत तसेच निर्यातीच्या बाजारात अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवा
  • संरक्षित शेतीसाठी जाहीर केलेले अनुदान मिळावे  
  • यांत्रिकीकरण क्‍लस्टर योजनेला गती द्या  
  • जागतिक दर्जाचे स्पर्धाक्षम वाण उपलब्ध करून द्यावेत.
  • द्राक्षशेतीसमोर विक्री व्यवस्थेचं आव्हान सर्वांत मोठे आहे. युरोपसह चीन, पूर्वोत्तर देश यासारख्या देशांत असंख्य संधी आहेत. चिली, पेरू, दक्षिण अफ्रिका सारख्या देशांत आपल्या बागेतील प्रत्येक घड निर्यातक्षम राहील या दृष्टीनेच नियोजन केले जाते. चीनसारखी मोठी बाजारपेठ असलेल्या देशातील बहुतांश ग्राहकांना रंगीत द्राक्षे हवी आहेत. मात्र आपण ती पुरवत नाही. ग्राहकांची आवड, निवड, क्षमता याचा अभ्यास करूनच यापुढे द्राक्ष उत्पादनाकडे पाहावे लागणार आहे. ही जबाबदारी व्यापारी किंवा वितरकांवर न टाकता शेतकरी म्हणून पुढे येण्याची गरज आहे. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक.

    यापुढील काळात स्पर्धा ही फक्त गुणवत्तेची राहणार आहे. येत्या काळात बहुतांश द्राक्ष उत्पादकांना व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. रसाळ, कुरकुरीत गोड चवीची द्राक्षेच ग्राहकांना हवी आहेत. दहा- बारा टनांपेक्षा अधिक वजन घेणे, ॲसिड, शुगर रेशो न सांभाळणे याबाबी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि एकूणच द्राक्षशेतीसाठी घातक ठरल्या आहेत. याकडे येत्या काळात प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. -अशोक गायकवाड,  माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे  

    द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आजपासून  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ५७ वे वार्षिक अधिवेशन आज (रविवार)  ते मंगळवार (ता.२९) या दरम्यान बालेवाडी, पुणे येथे होत आहे. रविवारी दुपारी दीड वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात तीन दिवस चिली येथील रॉड्रीगो असीवन यांच्यासह राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन होणार आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com