agriculture news in marathi, grapes and pomogrante crops become in trobule in jat, sangli, maharashtra | Agrowon

जत तालुक्यात पावसाअभावी द्राक्ष, डाळिंब पीक धोक्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सांगली  ः जत तालुक्‍यात यंदा सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. तालुक्‍यात केवळ २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी तालुक्‍यातून टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. तालुक्‍यातील १३ तलाव, २ मध्यम प्रकल्प आणि जलंसधारण विभागाचे ९ तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिके धोक्‍यात आली आहेत.

सांगली  ः जत तालुक्‍यात यंदा सरासरीइतकाही पाऊस झालेला नाही. तालुक्‍यात केवळ २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी तालुक्‍यातून टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. तालुक्‍यातील १३ तलाव, २ मध्यम प्रकल्प आणि जलंसधारण विभागाचे ९ तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिके धोक्‍यात आली आहेत.

जत तालुक्‍यावर वारंवार पावसाची अवकृपा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या भागातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करून लढत आहेत. यंदा तालुक्‍यात परतीचा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी निराश आहेत. तालुक्‍यातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून अनेक कामे झाली. मात्र, पाऊस नसल्याने या कामांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. तालुक्‍यातील तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे पडले आहेत.

सद्यःस्थितीत जत तालुक्‍यातील १६ गावांनी टॅंकरची मागणी केली आहेत. पण प्रशासन टॅंकर देण्यासाठी चालढकल करत आहेत. परंतु वास्तवात आजच्या स्थितीला ३० गावांना टॅंकरची गरज असल्याचे चित्र आहे. पुढील १५ दिवसांत टॅंकरची मागणी वाढण्याची शक्‍यता आहेत. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

पाणी मिळेना
जत तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे भूजलपातळी वाढलेली नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झालेली आहे. त्यामुळे जत तालुक्‍यात कधी या योजनेचे पाणी येणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४१ गावांत या योजनेचे पाणी मिळत नाहीत. यामुळे या भागातील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब पिकांना टॅंकरद्वारे पाणी द्यायचे म्हणले, तरी पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...