agriculture news in marathi, grapes crop damage due to rain, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात गारपीटीसह पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018
मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- सुभाष आर्वे, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
सांगली  ः सांगली जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी (ता. १५) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्‍यातील येळावी, तुरची, निमणी, बुरुंगवाडी, जुळेवाडी, यासह पलूस तालुक्‍यातील काही भागांत सुमारे अर्धा तास गारपीट झाली. यामुळे या सर्व भागांतील दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील तासगाव व सांगली शहरात बुधवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजेदरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
 
जिल्ह्यातील तासगाव आणि पलूस तालुक्‍यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर अचानक गारपीट सुरू झाली. त्यानंतर सुमारे दोन तास पाऊस सुरू होता. द्राक्षाची खरड छाटणी झाली असून, फुटवे चांगले फुटले होते. काड्या परिपक्व झाल्या होत्या. गाटपीट झाल्याने काड्या तुटून जमिनीवर पडल्या होत्या.
 
तासगाव आणि पलूस तालुक्‍यातील सुमारे दोन ते सव्वादोन हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागा बाधित झाल्या आहेत. द्राक्षाची परत छाटणी घ्यावी लागेल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. मात्र, परत छाटणी घ्यायची झाली तर त्यासाठी उष्णता लागते. पुढे पावसाळा आला असल्याने परत छाटणी घेणे शक्‍य नाही. त्यामुळे भविष्यात उत्पादन मिळेल याची शाश्‍वती नाही.
 
गारपीट झाली असल्याची माहिती मिळताच राज्य द्राक्ष बागायदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. यामध्ये किती क्षेत्र बाधित झाले आहे, याची माहिती संकलन करणे सुरू आहे.

तासगाव तालुक्‍यात गारपिटीने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे याचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. मात्र, गारपीट झाल्याची माहिती कृषी विभागाला कशी मिळाली नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. माहिती जरी मिळाली असली तरी कृषी विभागाचे अधिकारी नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी करण्यासाठी आलेच नाहीत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...