बुलडाणा जिल्ह्यात सोनेरी मण्याचा टापू झाला नामशेष

द्राक्षाची पाण्याची गरज पाहता ब्राह्मणवाडा संग्राहक तलाव तेथून चार किलोमीटर पाइपलाइन टाकली. उन्हाळ्यात मात्र पाणीटंचाईचे चटके बसू लागले. बाजारात अपेक्षित दरही पुढे मिळत नव्हता. अशी अनेक कारणे द्राक्ष क्षेत्र कमी होण्यामागे आहे. एकरी ९० ते १०० क्‍विंटलची वर्षभरात होत होती. २००६-०७ पासून लागवडीस सुरवात झाली २०१४-१५ मध्ये पूर्ण द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी काढल्या. द्राक्ष लागवड वाढल्यामुळे वायनरी उद्योगदेखील या भागात आला. त्यासाठीची द्राक्ष लावली गेली. परंतु वायनरीदेखील पुढे बंद पडल्या. - अजय देशमुख, अमडापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा.
द्राक्ष बाग
द्राक्ष बाग

बुलडाणा ः द्राक्ष लागवडीमुळे कधी काळी सोनेरी मण्याचा टापू अशी ओळख मिळविलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्‍यातून हे पीक आता हद्दपारच झाले आहे. बाजारात मिळणारा कमी दर, उन्हाळ्यात भासणारी पाण्याची टंचाई आणि स्कील्ड लेबर न मिळणे अशी अनेक कारणे यामागे दिली जातात.  बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्‍याचा भाग द्राक्ष पिकासाठी पोषक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यानंतर अमडापूर येथील प्रयोगशील शेतकरी अजय देशमुख यांनी या पिकाच्या लागवडीसाठी पुढाकार घेतला. पाच हजार वेली त्यांनी लावल्या. पहिल्या वर्षी १०० क्‍विंटलची उत्पादकता मिळाल्यानंतर त्यांनी या पिकाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. वित्त पुरवठ्याची अडचण होती. त्याकरीता अकोला कृषी विद्यापीठ तज्ज्ञांच्या उपस्थितीत अजय देशमुख यांच्या शेतात द्राक्ष पीक लागवड व व्यवस्थापन या विषयावर मेळावा घेण्यात आला. विद्यापीठ तज्ज्ञांनीदेखील हा भाग द्राक्षाकरिता पोषक असल्याचे सांगितले. त्यानंतर अमडापूर पासून १०० किलोमीटर अंतरावरील अकोला येथील युको बॅंक व्यवस्थापनाशी संपर्क साधत त्यांना कर्जासाठी राजी करण्यात आले. बॅंक व्यवस्थापनाने ३०० एकराचे कर्ज प्रकरण मंजूर केले. एकरी तीन लाख रुपये असे कर्ज देण्यात आले. 

द्राक्ष बागा झाल्या उद्‍ध्वस्त  द्राक्षाला उन्हाळ्यात पाण्याची अधिक गरज भासते. विदर्भात उन्हाळ्यात पाण्याचे स्राेत आटत असल्याने पिकाला पुरेसे पाणी मिळणे कठीण होत होते. विदर्भात हे पीक नसल्याने याकरीता स्कील्ड लेबर मिळत नव्हता. सटाणा येथून स्कील्ड लेबर छाटणीकरिता उशिरा पोचत होता. सुरवातीला प्रामाणिक मजुरांचा पुरवठा तेथील लेबर कंत्राटदार करीत. परंतु यातही नंतर लबाडी  होऊ लागली. २० पैकी १४ जण ट्रेनी मजूर राहत. उर्वरित पाच ते सहाच प्रशिक्षित मजूर होते. २७ रुपये प्रती झाड छाटणी दर आकारला जात होता. येण्याचा-जाण्याचा आणि मजुरांच्या खाण्याचा खर्चदेखील शेतमालकालाच करावा लागत होता. प्रतिक्रिया कवळा (ता. चिखली) ः जाधव यांनी १९९९ ला पहिल्यांदा द्राक्ष लागवड केली. त्यांचा हा पहिला प्रयोग होता. परंतु अनेक कारणांमुळे द्राक्ष क्षेत्र घटले. आता डाळिंबाचीदेखील तीच अवस्था आहे. - अशोक सुरडकर, तालुका कृषी अधिकारी, चिखली, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com