agriculture news in marathi, grapes crop facing water shortage,nashik, maharashtra | Agrowon

निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या संगोपनासाठी कसरत सुरू 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये खरड छाटण्यांची लगबग अंतिम टप्प्यात आहे. मात्र, विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्यामुळे द्राक्षबागांच्या संगोपनासाठी मल्चिंग अन् ठिबक सिंचनाचा आधार द्राक्ष बागायतदारांना घ्यावा लागत आहे.  

नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये खरड छाटण्यांची लगबग अंतिम टप्प्यात आहे. मात्र, विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्यामुळे द्राक्षबागांच्या संगोपनासाठी मल्चिंग अन् ठिबक सिंचनाचा आधार द्राक्ष बागायतदारांना घ्यावा लागत आहे.  

तालुक्यातील उगांव, वनसगाव, खडकमाळेगाव, शिवडी, नांदुर्डी, रानवड, सारोळे, सोनेवाडी, थेटाळे, पिंपळगाव बसवंत, निफाड, चांदोरी, सायखेडा, लासलगाव, देवगाव, नांदुरमध्यमेश्वर, करंजगाव आदी भागांत द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. द्राक्षमाल काढणीनंतर जवळपास सर्वत्रच खरड छाटण्यांचा अंतिम टप्पा सुरू आहे. द्राक्षबागांच्या खरड छाटणीनंतर निघणाऱ्या पालवीतूनच पुढील हंगामाच्या उत्पादनाची बिजे रोवली जातात. त्यामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांचे संगोपन करण्यात द्राक्ष बागायतदार व्यस्त आहेत.

द्राक्षबागेच्या खरड छाटणीनंतर चांगला फुटवा निघावा; याकरिता मुबलक पाणी देणे अपरिहार्य असते. मात्र, परिसरातील विहिरी, बोअरवेलने महिनाभरापूर्वीच तळ गाठला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर ठिबकच्या आधारे जेमतेम पाणी द्यावे लागत आहे. त्यातच उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे द्राक्षवेलीच्या बुडाजवळ मुळ्यांना ओलावा टिकवून राहू शकत नाही म्हणून द्राक्ष उत्पादकांनी ऊस, मक्याचे पाचट, भुसा, पाला बाडदान आदींचे मल्चिंग करून ठेवत द्राक्षवेल जगविण्याची धडपड सुरू आहे. द्राक्षवेलीच्या खरड छाटणीनंतर निघालेल्या पालवीतून तयार होणारी काडी भक्कम व परिपक्व होण्यासाठी सपकेन, शेंडाबाळी, फेलफुट अशी कामे केली जात आहेत. तसेच द्राक्षवेलीच्या कोवळ्या फुटीवर फवारणीदेखील केली जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...