agriculture news in marathi, grapes exhibition starts ,sangli, maharashtra | Agrowon

`द्राक्ष अाणि बेदाणा क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी मोठ्या संधी`
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

तासगाव, जि. सांगली  ः सकाळ माध्यम समूहाचे समाजाच्या सर्वच क्षेत्रातील काम उल्लेखनीय तर आहेच; परंतु शेती आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. द्राक्ष आणि बेदाणा क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या संधी असून, त्या शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून द्राक्ष-बेदाणा प्रदर्शनाचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन कृषी विभागीय सहसंचालक महावीर जंगटे यांनी केले.

तासगाव, जि. सांगली  ः सकाळ माध्यम समूहाचे समाजाच्या सर्वच क्षेत्रातील काम उल्लेखनीय तर आहेच; परंतु शेती आणि शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. द्राक्ष आणि बेदाणा क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या संधी असून, त्या शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून द्राक्ष-बेदाणा प्रदर्शनाचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन कृषी विभागीय सहसंचालक महावीर जंगटे यांनी केले.

तासगाव येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने ‘द्राक्ष व बेदाणा’ प्रदर्शनाचे गुरुवारी (ता. २५) उद्‌घाटन कोल्हापूर विभागाचे कृषी उपसंचालक महावीर जंगटे, तासगाव बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातयदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, सांगली तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, सांगली तासगाव कोल्ड स्टोअरेज असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मगदूम, डॉ. सतीश रहाळकर, नंदकुमार पाटील, ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे, सकाळचे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक उदय देशपांडे, अॅग्रोवन कोल्हापूरचे व्यवस्थापक शीतल मासाळ यांच्या उपस्थितीत झाले.

प्रदर्शनाचे तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, वेस्ट कोस्ट हर्बोकेम लि. हे मुख्य प्रायोजक, अग्रणी प्लॅस्टिक प्रा. लि., ‘युनिमेक सिस्टिम्स’सह प्रायोजक आहेत.

श्री. जंगटे यांनी या वेळी द्राक्ष आणि बेदाणा क्षेत्रात अद्याप खूप संशोधन करण्याची अपेक्षा व्यक्‍त करून शेतकऱ्यांनी अतिशय जिद्दीने ही द्राक्षे सातासमुद्रापार नेली आहे. अशा प्रदर्शनांमुळे या क्षेत्रात सुरू असलेले नवीन संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केले.

सुभाष आर्वे यांनी द्राक्ष बागातयदार संघाकडून द्राक्ष पीक आणि शेतकऱ्यांसाठी संघामार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रवींद्र पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला बेदाण्याचा पर्याय उभा राहू शकल्याचे प्रतिपादन केले.

या वेळी मनोज मालू, डॉ. सतीश रहाळकर, एन. बी. म्हेत्रे यांनीही प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. सुरवातीला प्रास्ताविक व स्वागत सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन शीतल मासाळ, रवींद्र माने यांनी केले. आभार रवींद्र माने यांनी केले.

२६ रोजी प्रसिद्ध ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांचे ‘द्राक्ष बागेचे जमीन व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यान दुपारी ३ वाजता, तर २७ रोजी ज्येष्ठ कृषी संशोधक डॉ. आर. डी. रावळ, बंगळूर यांचे ‘द्राक्ष बागेतील कीटकनाशक व बुरशीनाशकांचे व्यवस्थापन'' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...