तासगावला २५ जानेवारीपासून द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन

तासगावला २५ जानेवारीपासून द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन
तासगावला २५ जानेवारीपासून द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन

तासगाव, जि. सांगली : देशात आणि परदेशांत सांगली जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्राक्षे आणि बेदाणा क्षेत्रातील शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारे आगळेवेगळे ‘द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन २०१८’ सकाळ माध्यम समूहाच्या वतीने तासगाव (जि. सांगली) येथे २५ ते २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. द्राक्ष आणि बेदाणानिर्मितीसाठी उपयुक्‍त घटकांना या निमित्ताने एकाच छत्राखाली आणून शेतकरी व्यापाऱ्यांसाठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.

‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या या द्राक्ष-बेदाणा प्रदर्शनासाठी देशातील सर्वांत मोठी बेदाणा बाजारपेठ असलेली तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बेदाणा डीपिंग ऑइलमधील अग्रगण्य कंपनी वेस्ट कोस्ट हर्बोकेम लि. हे मुख्य प्रायोजक असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्षबागांसाठी शेडनेट, शेततळ्यांचे कागद निर्मितीमध्ये अल्पावधीत नाव मिळविलेले अग्रणी प्लॅस्टिक प्रा.लि., द्राक्षबागांसाठी व बेदाणानिर्मितीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानामध्ये संशोधन करून कमी खर्चात शेतकऱ्यांसाठी उपुयक्‍त औजारेनिर्मिती करणारे ‘युनिमेक सिस्टिम्स’सह प्रायोजक आहेत.

2014 मध्ये ‘सकाळ’ने भरविलेल्या देशातील पहिल्या बेदाणा प्रदर्शनाला राज्यातील नाशिकपासून ते कर्नाटकातील विजापूर बागलकोटपर्यंतच्या लाखो शेतकऱ्यांनी पसंतीची पोचपावती दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा अशाच प्रकारचे प्रदर्शन भरवून द्राक्ष आणि बेदाणा क्षेत्रातील शेतकरी, व्यापारी उद्योजकांपर्यत नवे तंत्रज्ञान, बाजारपेठ कौशल्ये, नवे संशोधन, नव्या व्यवसायवाटा उपलब्ध करून देण्यासाठी तासगाव बाजार समितीच्या आवारातील भव्य बेदाणा ऑक्‍शन हॉलमध्ये सुसज्ज असे द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन 25 ते 28 जानेवारी 2018 मध्ये भरविण्यात येत आहे.

सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर बागलकोट जिल्ह्यामध्ये द्राक्षशेती वेगाने वाढत आहे. द्राक्षशेतीतील उलाढाल 10 हजार कोटींवर पोचली आहे. वर्षभर चालणारी बेदाणा इंडस्ट्री तर 7 हजार कोटींवर पोचली आहे. सांगलीची द्राक्षे जगाच्या बाजारपेठेत कधीच पोचली आहेत. तर सांगलीच्या बेदाण्याला तर जीआय मानांकन मिळाल्याने बेदाण्यासाठी आता जगाची बाजारपेठ खुाली झाली आहे. द्राक्षबाग उभारणीपासून ते बेदाणा विक्रीपर्यंत असंख्य घटक शेतकऱ्यांना आवश्‍यक असतात, त्यामध्ये बागेसाठी लागणारी तार, अँगल, ठिबकसिंचन प्रणाली, खते औषधे, संजिवके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, मशागतीसाठी लागणारी अवजारे, ट्रॅक्‍टर्स, औषध फवारणीसाठी पंप, ब्लोअर्स, द्राक्ष काढणीसाठी कात्र्या, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्‍सेस, बेदाणा तयार करण्यासाठी डीपिंग ऑइल, प्लॅस्टिक क्रेट, शेडनेट, शेततळ्यांचे कागद, प्लॅस्टिक आच्छादणे, जाळ्या, बेदाणा मळणी मशिन्स, निटिंग मशिन्स, ग्रेडिंग मशिन्स, कलर सॉर्टर मशिन्स, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, कोल्ड स्टोअरेजना लागणारे तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री असे नवे अवकाश उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी खुले झाले आहे. हे सारे घटक एकाच छताखाली आणण्याचा मानस ठेवून सकाळ माध्यम समूहाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंगसाठी अजित 9822090822, परितोष 9766213003 रवींद्र 9763723088 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com