दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्प

दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्प
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्प

पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याने देश हादरला आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर नाशिक जिल्ह्यातून काश्‍मिरला दररोज होणारा २०० टन द्राक्षांचा पुरवठा ठप्प झाला आहे.  गेल्या महिनाभरापासून थंडीच्या कचाट्यात अडकलेला द्राक्ष हंगाम गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढल्याने सुरळीत होण्याच्या मार्गावर होता. परराज्यात दिवसाला सुमारे तीन हजार टन द्राक्षे पिंपळगाव बसवंत, वडनेरभैरव, उगाव आदी भागांतून ट्रकद्वारे पोचत होते. थंडीच्या शुक्‍लकाष्ठातून बाहेर पडू पाहणारा द्राक्ष हंगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काहीसा अडचणीत सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज दहा ट्रकमधून २०० टन द्राक्षे काश्‍मिरच्या श्रीनगर, पुलवामा, बारामुल्ला आदी भागांत पोचत होते. पिंपळगाव शहरातील जम्मू-काश्‍मिरसाठी द्राक्षे पाठविणाऱ्या ट्रान्स्पोर्टवर ट्रक उभे आहेत. श्रीनगरमधून सफरचंद घेऊन येणारे ट्रक पिंपळगाव बसवंतमधून द्राक्षे घेऊन जातात. श्रीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव रोखण्यात आली. हल्ल्याच्या दोन दिवस आधी रवाना झालेले ट्रक इतर राज्यात वळविण्यात आले. काश्‍मीर खोरे धगधगत असल्याने त्याचा परिणाम द्राक्षांच्या दरावर होण्याची चिन्हे आहेत. ट्रान्स्पोर्टचे संचालक सिंग म्हणाले, की हल्ल्याने काश्‍मिरमध्ये होत असलेले दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. स्थिती पूर्वपदावर कधी येते त्यावर द्राक्षांचा पुरवठा अवलंबून आहे. काश्‍मिरला जाणारे द्राक्षांचे ट्रक हल्ल्यामुळे उभे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com