Agriculture news in marathi, Grapes Farm | Agrowon

पाण्याविना द्राक्ष बागा वाळू लागल्या
अभिजित डाके
रविवार, 10 सप्टेंबर 2017

तासगाव पूर्व भागात पाणीटंचाई असल्याने बागा वाळू लागल्या आहेत. पण बागा जिवंत ठेवण्यासाठी यंदा फळ छाटणी घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण त्यातून उत्पन्न मिळणे कठीण आहे.
- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव

सांगली ः पाणीटंचाई आणि पावसाचा खंड याचा फटका द्राक्ष पिकालाही बसू लागला आहे. तासगाव, जत, खानापूर तालुक्‍यातील द्राक्ष बागा पाण्याविना वाळू लागल्या आहेत.

द्राक्ष बागा जिवंत ठेवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धडपड सुरू आहे. याचा फटका उत्पादनाला बसण्याची शक्‍यता आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 लाख एकरवर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस भीषण होत चाचली आहे. त्यातच पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे पाणी उपलब्ध करणे कठीण झाले आहे.

विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक मोठ्या विवंचनेत सापडला आहे. दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्‍याचा पूर्व भाग, जत तालुक्‍याचा पूर्व आणि पश्‍चिम भागातील द्राक्ष शेती संकटात आली आहे.

पाण्याची टंचाई आणि पावसाची दडी यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे हाल सुरू आहेत. सध्या उपलब्ध होईल त्या पाण्यावर द्राक्ष शेती जिवंत ठेवण्याचे काम शेतकरी करत आहेत. तासगाव तालुक्‍यातील जरंडी, सावळज, सिद्धेवाडी, यमगरवाडी, वायफळे तसेच खानापूर तालुक्‍यातील पळशी गावांतील द्राक्ष बागा वाळू लागल्या आहेत.

जत तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती आहे. या ठिकाणी बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते. पण या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नसल्याने द्राक्ष बागा वाळून गेल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांनी फळ छाटणीचा विचारदेखील केला नाही. फळ छाटणी केली नाही तर बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बागा जगविल्या पाहिजेत, यासाठी शेतकरी धडपडत अाहेत.

द्राक्ष बागेला पाणी उपलब्ध नाही. यामुळे सुमारे 10 किलोमीटरवरून पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी एका तासाला एक हजार रुपये मोजावे लागते आहे. पाण्याअभावी द्राक्ष पीक धोक्‍यात आले आहेत.
- सुभाष गायकवाड, डफळापूर, ता. जत

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून...अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील...
‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं...शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर...
नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील...नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०)...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
द्राक्षावर रोगांचा धोका वाढलासर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये...
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद,...
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर...राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर...
दूध संघांना सावरण्यासाठी त्रिसदस्यीय... विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३०...