जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि श्रीलंकेत 

जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि श्रीलंकेत 
जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि श्रीलंकेत 

नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका या देशात निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम दर्जाच्या द्राक्षाला पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे यांनी दिली. 

हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात पावसाचा अंदाज दिला होता. यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या वर्षी छाटणीच्या वेळापत्रकात बदल केल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात आगाऊ छाटणी न करता ऑक्‍टोबर महिन्यात छाटणी केली होती. आगाऊ सप्टेंबर महिन्यात छाटणी केलेल्या जंबो व शरद सिडलेस द्राक्षाचा तोडणी हंगाम सध्या सुरू आहे. ऑक्‍टोबर छाटणीचा तोडणी हंगाम एक फेब्रुवारीपासून सुरू होईल. पंधरा दिवसापूर्वी निर्यातक्षम जंबो द्राक्षाला प्रती किलो एकशे चाळीस रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मागील दोन दिवसांपासून बाजारभावात घट झाली आहे, अशी माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर यांनी दिली.

प्रतिकिलो १२५ रुपये भाव नारायणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शिवाजी तोडकरी यांनी दीड एकर क्षेत्रात सहा टन निर्यातक्षम व दोन टन दुय्यम द्राक्षाचे उत्पादन निघाले. निर्यातक्षम सहा टन द्राक्षाला प्रतिकिलो १२५ रुपये भाव मिळाला. द्राक्ष विक्रीतून सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

कृषी विभागाकडे तालुक्‍यातील ८१० निर्यातदार शेतकऱ्यांनी ५८९ हेक्‍टर क्षेत्रातील द्राक्षाची नोंदणी केली आहे. सद्यःस्थिती पाहता या वर्षी तालुक्‍यात निर्यातक्षम द्राक्षाचे विक्रमी उत्पादन निघणार आहे. व्यापारातील फसवणूक टाळण्यासाठी उत्पादकांनी उधारीवर द्राक्षाची विक्री करू नये. - बापू रोकडे, कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com