agriculture news in marathi, grapes need more rain to strengthen stem | Agrowon

द्राक्षाच्या सक्षम काडीला हवीय वरुणराजाची दमदार साथ
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा द्राक्ष बागांसाठी वरुणराजाच्या दमदार साथीची आवश्‍यकता आहे.

नाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा द्राक्ष बागांसाठी वरुणराजाच्या दमदार साथीची आवश्‍यकता आहे.

राज्यात साडेतीन लाख एकरांपर्यंत द्राक्ष बागा पोचल्या आहेत. त्यात द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील बागांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगामात उशिरापर्यंत छाटणी चालल्याने शेतकऱ्यांना द्राक्षांचे उत्पादन आणि भावही चांगले मिळालेत. मध्यंतरी पुण्यात सोलापूरमधील भेटलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार 10 जूनपर्यंत द्राक्ष विकले जातील, असे सांगून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी आता द्राक्षांना 70 ते 80 रुपये किलो भाव मिळत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की मागील हंगामातील अनुभवाच्या आधारे यंदा खरड छाटणीची कामे लवकर पूर्ण करण्यात आल्याने पुढील हंगामात चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना शाश्‍वती मिळाली आहे.

मॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह राज्याच्या विविध भागामध्ये हजेरी लावली. येत्या तीन दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे आता जोरदार पाऊस झाला, तरीही त्याचा विपरित परिणाम द्राक्ष बागांवर होणार नाही. पावसाच्या हजेरीनंतर सूर्यप्रकाश मिळाल्यास बागांना अधिक मदत होईल. मात्र, सतत ढगाळ हवामानाची स्थिती राहिल्यास डावणी, भूरी, करपाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीवर खर्च करावा लागेल.

अन्नद्रव्य, संजीवकांचा डोस
खरड छाटणीनंतर काडी विरळणी करत सहा ते सात पानावर शेंडा छाटण्यात आला. त्यावर निघालेल्या बगल फुटीपैकी टोकाकडील फूट ठेवून बाकी फुटी काढण्यात येत आहेत. दहा ते बारा पानांवर "टॉपिंग' केले जात आहे. याशिवाय फलधारणेसाठी अन्नद्रव्य, संजीवके आणि जमिनीतून खतांचे डोस देण्यात येत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...
साताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...
जुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
बायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...
हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...
बार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...
मुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...
कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...