agriculture news in marathi, grapes producers Scare to changed, Maharashtra | Agrowon

बदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

डाउनी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेतील 
गवत काढून टाकले पाहिजे. गंधकाचा वापर करावा; तसेच स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करताना योग्य मात्रा घेऊन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. याबरोबर द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञाचा सल्ला घेऊन रोगाचा प्रादुर्भाव कमी करता यईल.
- एन. बी. म्हेत्रे, द्राक्ष तज्ज्ञ

सांगली ः सांगली जिल्ह्यामध्ये मिरज पूर्वसह काही भागांमध्ये द्राक्षे पिकाच्या छाटण्या आगाप घेण्यात येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या वातावणामुळे द्राक्षे पीक धोक्‍यात आले आहे. सकाळी धुके आणि दिवसभर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.

जिल्ह्यात सुमारे १ लाख ११ हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्ष पिकाचे आहे. यापैकी सुमारे ४० हजार हेक्‍टरवरील द्राक्ष उत्पादक शेतकरी आगाप छाटणी घेतात. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीच्या छाटणीला अगोदरची (आगाप) छाटणी म्हणतात. छाटणी पावसाळ्यात येत असल्याने कीड व रोग यापासून काळची घ्यावी लागते. आणि ही द्राक्षे दिवाळ्यात तयार होत असल्यामुळे गोडीस कमी असतात; पण या वेळेस रमजान, नववर्ष व नाताळ येत असल्यामुळे भाव चांगला मिळतो.

यंदाही आगाप छाटणी जिल्ह्यात झालेली आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसतो आहे. आधईच आगाप छाटणी केलेल्या पिकाला जास्त जपावं लागतं त्यात वातावरणाचीही साथ सुटली तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. 

छाटणीनंतर पोंगा अवस्था असताना ढगाळ वातावरण व सतत पाऊस राहिल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. घड जिरणे म्हणजेच त्या फुटीतून घड बाहेर न पडता त्याचे बालीमध्ये रूपांतर होणे. जिल्ह्यातील मिरज पूर्व भागासह इतर काही तालुक्‍यांमध्ये लवकर छाटण्या असतात. अशा छाटण्या झाल्यानंतर मागील वर्षी या परिसरात जुलै, ऑगस्टमध्ये अतिपाऊस झाला. या परिसरातील द्राक्षबागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढले. 

जमीन घट्ट झालेली असल्यास मुळांचे कार्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. परिणामी, पोषण द्रव्यांची उपलब्धता न झाल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. आता गेल्या आठवड्यापासून असे वातावरण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कर्ज काढून बाग घातलेले शेतकरी या वातावरणामुळे धास्तावले आहेत.
 

प्रतिक्रिया
रात्री थंडी आणि दिवसा वाढती 
उष्णता यामुळे फळछाटणी करणे कठीण झाले आहे. आगाप फळछाटणी केलेल्या बागांवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने छाटणी थांबली आहे.
- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक, वायफळे, ता. तासगाव

इतर अॅग्रो विशेष
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
कडवंची : हमखास मजुरी देणारं गावद्राक्षबागांमुळे कडवंची गावात बारमाही रोजगार तयार...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...