Agriculture News in Marathi, Grapes season start in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

सांगली ः सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामास प्रारंभ होत असून, मिरज पूर्व भागात सध्या द्राक्षबागांच्या पाहणीचा धडाका व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात सुमारे 30 ते 40 टक्के घट झालेली असल्यामुळे द्राक्षाच्या दरात उत्पादकांना वाढ अपेक्षित आहे.

सांगली ः सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्ष हंगामास प्रारंभ होत असून, मिरज पूर्व भागात सध्या द्राक्षबागांच्या पाहणीचा धडाका व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनात सुमारे 30 ते 40 टक्के घट झालेली असल्यामुळे द्राक्षाच्या दरात उत्पादकांना वाढ अपेक्षित आहे.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी एकरी 25 ते 30 टक्के बांगामध्ये फुळगळ व फळकूज झाली होती. मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग, तसेच वाळवा तालुक्‍याचा काही भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात ऑगस्टमध्ये फळ छाटणी घेतात. त्यांनाही मोठा फटका बसला. त्या तडाख्यातून वाचलेल्या बागा सध्या बहरू लागल्या आहेत.

जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, अनेक भागांत काळ्या द्राक्षांना 530 ते 550 प्रतिपेटी (चार किलोची पेटी) अशा दराने व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.

जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक आहे. मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागात आठ दिवसांत द्राक्ष काढणी सुरू होत आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरवातीला सरासरी 400 रुपये प्रतिपेटी (चार किलोची पेटी) असा दर होता. त्यानंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात सरासरी 200 रुपये असा दर मिळत होता. यंदाच्या हंगामात सध्यातरी 100 ते 150 रुपयांनी दर चढे मिळत आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने सुमारे 30 ते 40 टक्के नुकसान झाले आहे. आगाप घेतलेल्या द्राक्षबागांची द्राक्षे मार्केटमध्ये येऊ लागली आहेत. यंदाच्या हंगामात दर वाढण्याची शक्‍यता आहे.
- सुभाष आर्वे, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागातयदार संघ

गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात द्राक्षाला 90 ते 100 रुपये प्रतिबॉक्‍सला अधिक मिळताहेत. पुढील काही दिवसांत द्राक्षाचे दर वाढतील अशी आशा आहे.
- गिरीष देशपांडे, शेतकरी, आरग, जि. सांगली

इतर ताज्या घडामोडी
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
उस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
सातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
कोल्हापुरातील ऊस गाळप हंगाम अंतिम... कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...