agriculture news in Marathi, grapes season starts in sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीतील द्राक्ष हंगामास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

तासगाव, जि. सांगली ः तब्बल पाच वेळा हवामानातील बदलाचा फटका, डाऊनीमुळे नुकसान या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्‍यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला अाहे. द्राक्ष काढणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात कृष्णा चमनला चार किलोस ४५१, तर सोनाकाला २९१ रुपये असा दर मिळाला. तासगाव, मणेराजुरी, सावळज आळते येथील द्राक्षे बाजारपेठेत रवाना होऊ लागली आहेत. 

तासगाव, जि. सांगली ः तब्बल पाच वेळा हवामानातील बदलाचा फटका, डाऊनीमुळे नुकसान या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्‍यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला अाहे. द्राक्ष काढणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात कृष्णा चमनला चार किलोस ४५१, तर सोनाकाला २९१ रुपये असा दर मिळाला. तासगाव, मणेराजुरी, सावळज आळते येथील द्राक्षे बाजारपेठेत रवाना होऊ लागली आहेत. 

या वर्षी अनेक अास्मानी संकटाला द्राक्ष बागायतदारांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे या वर्षीच्या द्राक्ष हंगामाबाबत साशंकता होती. लवकर छाटणी केलेल्या बागांवर डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामध्ये अनेक बागा अक्षरशः सोडून द्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे हंगाम उशिरा सुरू होईल असे वाटत असताना नेहमीप्रमाणे हंगामाची सुरवात आशादायक झाली आहे.

तासगाव येथील सुदाम माळी यांच्या सोनाका जातीच्या हिरव्या द्राक्षांना चार किलोस २९१ रुपये असा दर मिळाला. तर त्यांच्याच कृष्णा चमन जातीच्या काळ्या द्राक्षांना ४५१ रुपये प्रतिचार किलो असा दर मिळाला. तमिळनाडूच्या द्राक्ष व्यापाऱ्याने ही द्राक्षे खरेदी केली. सदया तासगाव मणेराजुरी, आळते, सावळज, बेळंकी सलगरे आणि मिरजपूर्व भागातील काही गावांमधीाल द्राक्षे काढणीसाठी तयार झाली असून, दक्षिण भारतातील द्राक्ष व्यापारी द्राक्षांच्या शोधात फिरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

डिसेंबर-जानेवारीमध्ये द्राक्षांना चांगले दर मिळत असल्याने काही द्राक्ष उत्पादक शेतकरी धाडस करून लवकर छाटण्या घेतात. परिणामी, डिसेंबरमध्ये ख्रिसमससाठी ही द्राक्षे उपलब्ध होतात. मात्र त्यासाठी खूप मोठी जोखीम द्राक्ष बागातयदारांना घ्यावी लागते. डिसेंबर-जानेवारीमध्ये बदलते हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्‍यता असते. या संकटावर मात करत या वर्षी द्राक्षे बाजारात आली असून, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत द्राक्षे रवाना होऊ लागली आहेत.

उत्पादन घटण्याची शक्यता
सलग एकापाठोपाठ आलेल्या अस्मानी संकटामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले अाहे. अनेक बागातयदारांना गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍क्यांपेक्षा जादा द्राक्ष पिकामध्ये घट झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. सध्या सुरू झालेली द्राक्षे कमी गोडीची असली, तरी आकर्षक रंगांमुळे बाजारात मागणी असल्याचे मत द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्‍त करत आहेत.

इतर बातम्या
करवंद... ‘डोंगराची काळी मैना’ला बहर...तळवाडे दिगर, जि.नाशिक : डोंगराची काळी मैना...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
पशुगणना अखेर सुरू होणार; टॅब खरेदी...पुणे  : बाजारभावापेक्षा माहिती तंत्रज्ञान...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
लाळ्या-खुरकूतप्रकरणी चौकशी समितीस...मुंबई : गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांच्या...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
कांदा उत्पादकांसाठी बाजार समित्याच...नामपूर, जि. नाशिक : कांद्याचे आगार असलेला नाशिक...
कृषी विभागात घोटाळेबाजांसाठी ‘मागेल...पुणे : कृषी विभागातील घोटाळेबहाद्दर...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...