द्राक्ष बागायतदार संघातर्फे नाशिकला बुधवारी ऑक्टोबर छाटणी चर्चासत्र

द्राक्ष
द्राक्ष

नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे बुधवारी (ता. ४) द्राक्षावरील ऑक्टोबर छाटणी चर्चासत्र दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका, नाशिक येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अशोक गायकवाड, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी सह-संचालक दिलीपराव झेंडे, जिल्हा अधीक्षक टी. एन. जगताप, कृषी अधिकारी नाशिक, डॉ. एस. डी. सावंत, संचालक एन. आर. सी. जी. पुणे तसेच शासकीय उच्च पदस्थ उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रामध्ये द्राक्षबागेवरील रोग व्यवस्थापन, डाऊनी मिलीड्यूचे नियंत्रण व कीड नियंत्रण, द्राक्ष बागेतील जमिनीची अवस्था त्याचप्रमाणे जमीन, खत व पाणी व्यवस्थापन, संजीवकाचा वापर, कॅनोपी व फळ व्यवस्थापन या विषयांवरती राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे चे संचालक डॉ. एस. डी. सावंत, तसेच डॉ. ए. के. उपाध्याय, डॉ. आर. जी. सोमकुवर, डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. दिपेंद्र सिंग यादव हे मार्गदर्शन करणार आहेत.  चर्चासत्राच्या निमित्ताने विविध कंपन्यांचे स्टॅाल लागणार असून या महत्त्वपूर्ण चर्चासत्राचा सर्व द्राक्ष बागायतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील, मानद सचिव रवींद्र बोराडे व मध्यवर्ती विज्ञान समिती, पुणे चेअरमन कैलास भोसले, तसेच सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com