राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १००० ते ३९०० रुपये

हिरवी मिरची
हिरवी मिरची

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची स्थानिक आणि परराज्यांतून सुमारे १५ टेंपाे आवक झाली हाेती. या वेळी प्रतिक्विंल १५०० ते ३५०० रुपये दर हाेता. सध्याचा दर सरासरी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये सध्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमधून प्रामुख्याने सुमारे १० ते १२ टेंपाे आवक हाेत आहे. तर स्थानिक मध्ये पुणे विभागातील विविध जिल्ह्यांसह जळगाव आणि पालघर परिसरातून ४ ते ५ टेंपाे आवक हाेत आहे. मात्र आंध्र प्रदेशातील आकाराने लहान, रंगाने गडद हिरव्या मिरचीचा तिखट पण अधिक असल्याने दर सर्वसाधारण मिरचीपेक्षा अधिक असून, प्रति १० किलाेला ३०० ते ३५० रुपये दर असल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले. परभणीत प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये परभणी : येथील जुना मोंढा भागातील भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसर, तसेच तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ येथून हिरव्या मिरचीची आवक येते आहे. गेल्या चार आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची ३० ते ६० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते ३७०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) ६० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये होते, तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकास बोराडे यांनी सांगितले. नागपुरात प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये  नागपूर ः मार्चच्या सुरवातीला ४००० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचलेल्या हिरव्या मिरचीच्या दरात महिनाअखेरीस मात्र चांगलीच घसरण होत हे दर अर्ध्यावर पोचले आहेत. २१ मार्चपासून सरासरी १९० क्‍विंटल आवक असलेल्या मिरचीचे व्यवहार कळमणा बाजार समितीत १००० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत. नागपूरसह यवतमाळ, अमरावती, लगतच्या मध्य प्रदेशातून मिरचीची आवक होत आहे. ४ मार्चला २३० क्‍विंटल आवक होऊन २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. त्यानंतर सरासरी आवक २२० ते २५० क्‍विंटलची राहिली आणि २००० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. १२ मार्चपासून हे दर १००० ते २००० रुपये क्‍विंटलपर्यंत घसरले. १९ मार्च रोजी १००० ते १८०० असा दर होता. त्यानंतर आता पुन्हा १००० ते २००० रुपये क्‍विंटलने हिरव्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. जळगावात प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये​ जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होऊन १२०० ते २५०० व सरासरी १७०० रुपये दर मिळाला. बाजारात दोंडाईचा (जि. धुळे), नंदुरबार, सिल्लोड (जि. औरंगाबाद), पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) आदी भागांतून आवक होत आहे. या महिन्याच्या सुरवातीला कमाल दर ३८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाला होता. यानंतर दर कमी झाले, पण ते स्थिर आहेत. बाजार समितीत मागील २१ दिवसांपासून हिरव्या मिरचीला सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.  महिनाभरापासून आवक ३० ते ३५ क्विंटल प्रतिदिन, अशी राहीली आहे. स्थानिक भागातून आवक नाही. आवक कमी असल्याने काही अडतदारांनी शेतकऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. नगरमध्ये प्रतिक्विंटल २००० ते ३९०० रुपये नगर (प्रतिनिधी) ः नगर कृषी बाजार समितीत गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ७५ क्‍विंटल आवक झाली होती. तीस २००० ते ३९०० व सरासरी २९०० रुपयाचा दर मिळाला. बाजार समितीत साधारण सरासरी ९० ते शंभर क्‍विंटलची आवक होत असते. १५ मार्चला ३६ क्विंटलची आवक होऊन २००० ते ३००० रुपये व सरासरी २५०० रुपयाचा दर मिळाला. ८ मार्चला तीन हजार ते सहा हजार रुपयाचा व साडेचार हजाराचा सरासरी दर मिळाला. १ मार्चला ५६ क्‍विंटलची आवक होऊन चार हजार ते पाच हजार आठशे रुपयांचा दर मिळाला. २२ फेब्रुवारीला आवक कमी होती. दहा क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते चार हजारांचा दर मिळाला. १५ फेब्रुवारीला ६७ क्विंटलची आवक होऊन चार हजार ते साडेपाच हजारांचा व पाच हजारांचा सरासरी दर मिळाला. सांगलीत दहा किलोस ३५० ते ४०० रुपये सांगली ः येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरचीची आवक गेल्या सप्ताहापासून वाढली आहे. गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची  ८० पोत्यांची (प्रति पोत्याचे वजन ४५ ते ५० किलो) आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस ३५० ते ४०० असा दर होता. शिवाजी मंडईत आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतून प्रामुख्याने मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यालगत असणाऱ्या शिरोळ तालुक्‍यासह जिल्ह्यातील  आष्टा, मिरज, पलूसया भागांतून मिरचीची आवक सुरू झाली आहे. आवक जरी वाढली असली तरी हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहामध्ये मिरचीची आवक व दर वाढेल असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला.  सोलापुरात दहा किलोस १०० ते २५० रुपये​ सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक वाढलेली राहिली, पण मागणी चांगली असल्याने हिरव्या मिरचीचे दर टिकून राहिले. हिरव्या मिरचीला प्रति दहा किलोसाठी १०० ते २५० व सरासरी १५० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात रोज २०० ते २५० क्विंटल इतकी आवक झाली. आवक स्थानिक भागातूनच झाली. या सप्ताहात दोन ते अडीच टन इतकी आवक राहिली, तर दर प्रति दहा किलोसाठी १०० ते २५० व सरासरी १५० रुपये मिळाला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दीड टनापर्यंत आवक राहिली. दर १२० ते २७० व सरासरी २०० रुपये मिळाला आणि पहिल्या आठवड्यात १०० ते २५० व सरासरी १२० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांचा विचार करता हिरव्या मिरचीला मागणी आणि दर दोन्ही टिकून राहिल्याचे दिसते. कोल्हापुरात दहा किलोस ३०० ते ५४० रुपये कोल्हापूर: येथील बाजार समितीत हिरव्या मिरचीस दहा किलोस ३०० ते ५४० रुपये इतका दर मिळत आहे. हिरव्या मिरचीची दररोजची आवक ३०० पोती होत आहे. गेल्या सप्ताहापासून मिरचीचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत बेळगाव सीमाभागातून हिरव्या मिरचीची आवक होते. इतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर खाली आले असले तरी मिरचीचे दर अपवाद वगळता स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. अकोल्यात प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये​ अकोला : येथील भाजी बाजारात सध्या हिरवी मिरची सरासरी १८०० ते २००० रुपये क्विंटल दराने विकत अाहे. तर दररोजची अावक सध्या १० ते १५ टनांपर्यंत पोचली अाहे. साधारणतः १५ दिवसांपूर्वी ३००० रुपयांवर विकणारी मिरची अावक वाढताच हजार रुपयांनी घसरली अाहे. अकोला बाजारात स्थानिक भागासह नागपूर, मध्यप्रदेशातून मिरचीची अावक होते. मागील अाठ ते दहा दिवसांपासून मिरचीची अावक सातत्याने वाढत अाहे. याचा परिणाम दरांवर झाला अाहे. पंधरा दिवसांपूर्वी मिरची ३००० ते ३५०० रुपये क्विंटल विकत होती. परंतु हाच दर अाता १८०० पर्यंत घसरला अाहे. साधारणतः गेल्या अाठ दिवसांपासून १८०० ते २००० दरम्यान मिरची विकल्या जात अाहे. किरकोळ बाजारात मिरची ३५ ते ४० रुपये किलोने ग्राहकांना विकत घ्यावी लागते अाहे. मिरचीची अावक वाढल्यास दरांमध्ये अाणखी घटीची शक्यता व्यापारी सूत्राने व्यक्त केली. औरंगाबादेत प्रतिक्विंटल १००० ते १६०० रुपये औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची १०२ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  बाजार समितीमध्ये १७ मार्चला १९६ क्‍विंटल आवक होऊन २००० ते २५०० रुपये दर मिळाला. १८ मार्चला १३५ क्‍विंटल आवक तर दर १५०० ते २५०० रुपये राहिले. १९ मार्चला १०९ क्‍विंटल आवक होऊन १६०० ते २००० रुपये दर मिळाला. २० मार्चला आवक ५५ क्‍विंटल तर दरही १८०० ते २००० रुपये राहिले. १९ मार्चला ९० क्‍विंटल आवक होऊन १५०० ते २००० रुपये दर मिळाला. ३ जानेवारीला ४० क्‍विंटल आवक तर ३००० ते ३६०० रूपये दर मिळाला. ३० जानेवारीला ६० क्‍विंटल आवक होऊन दर २००० ते ४००० रुपये दर राहिला. २२ फेब्रुवारीला ७९ क्‍विंटल आवक होऊन २००० ते ४००० रुपये दर मिळाला. २७ फेब्रुवारीला २५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com