जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११०० ते ३००० रुपये

हिरवी मिरची
हिरवी मिरची

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २३) तिला किमान ११०० कमाल ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक २८ क्विंटल झाली होती.  मागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ क्विंटल प्रतिदिन आवक होती. या आठवड्यात आवकेत काहीशी घट झाल्याने दरात आणखी सुधारणा झाली आहे. मिरचीची आवक दोंडाईचा (जि. धुळे), पहूर, शेंदूर्णी  (ता. जामनेर, जि. जळगाव), विदगाव आदी भागांतून होते. जळगावनजीकच्या नंदुरबार भागात मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम जळगावच्या बाजारातही दिसून येत असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळतील, असे संकेत मिळत आहेत. बाजारात अद्रकची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २४०० आणि सरासरी २००० रुपये दर मिळाला. वाटाण्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २१०० आणि सरासरी १६०० रुपये दर होता. बोरांची १० क्विंटल आवक झाली. त्याला ११०० ते १७०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिंबाची १० क्विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १६०० आणि सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल दर होता. पपईची पाच क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते १६०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. तिला १४०० ते २१०० आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. त्याला ४०० ते १००० आणि सरासरी ६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. कांद्याची ४७५ क्विंटल आवक झाली. त्याला १२५० ते २८०० आणि सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. टोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. त्याला ३०० ते ६५० आणि सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. तिला ४०० ते १००० आणि सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com