agriculture news in Marathi, green chili at 1100 to 3000 rupees in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ११०० ते ३००० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २३) तिला किमान ११०० कमाल ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक २८ क्विंटल झाली होती. 

मागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ क्विंटल प्रतिदिन आवक होती. या आठवड्यात आवकेत काहीशी घट झाल्याने दरात आणखी सुधारणा झाली आहे. मिरचीची आवक दोंडाईचा (जि. धुळे), पहूर, शेंदूर्णी  (ता. जामनेर, जि. जळगाव), विदगाव आदी भागांतून होते.

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होत असून, मंगळवारी (ता. २३) तिला किमान ११०० कमाल ३००० व सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक २८ क्विंटल झाली होती. 

मागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत घट झाली आहे. मागील आठवड्यात सरासरी ३५ क्विंटल प्रतिदिन आवक होती. या आठवड्यात आवकेत काहीशी घट झाल्याने दरात आणखी सुधारणा झाली आहे. मिरचीची आवक दोंडाईचा (जि. धुळे), पहूर, शेंदूर्णी  (ता. जामनेर, जि. जळगाव), विदगाव आदी भागांतून होते.

जळगावनजीकच्या नंदुरबार भागात मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम जळगावच्या बाजारातही दिसून येत असून, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळतील, असे संकेत मिळत आहेत. बाजारात अद्रकची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २४०० आणि सरासरी २००० रुपये दर मिळाला.

वाटाण्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २१०० आणि सरासरी १६०० रुपये दर होता. बोरांची १० क्विंटल आवक झाली. त्याला ११०० ते १७०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लिंबाची १० क्विंटल आवक झाली. त्याला ८०० ते १६०० आणि सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

पपईची पाच क्विंटल आवक झाली. तिला १२०० ते १६०० आणि सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. तिला १४०० ते २१०० आणि सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. त्याला ४०० ते १००० आणि सरासरी ६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

कांद्याची ४७५ क्विंटल आवक झाली. त्याला १२५० ते २८०० आणि सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. टोमॅटोची ३१ क्विंटल आवक झाली. त्याला ३०० ते ६५० आणि सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कोथिंबिरीची पाच क्विंटल आवक झाली. तिला ४०० ते १००० आणि सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

इतर बाजारभाव बातम्या
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
साताऱ्यात प्रतिदहा किलो वाटाण्यास १२००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीला मागणी...सोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात आले ३५०० ते ५८०० रुपये क्विंटलजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता...
परभणी बाजार समितीत कापूस खरेदीस सुरवातपरभणी  ः परभणी बाजार समितीच्या कॅाटन मार्केट...
कोल्हापुरात गूळ प्रतिक्विंटल ३००० ते...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कोल्हापुरात लक्ष्मीपूजनासाठी फळांची आवक...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात विविध...
औरंगाबादेत सीताफळ १००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात दिवाळीच्या तोंडावर शेतमालाचे दर...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात कांद्याचे दर टिकूनसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकला कांदा, टोमॅटोची आवक वाढलीनाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या...
कोल्हापुरात ओला वाटाणा भाज्यांच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरमध्ये भाजीपाल्याची आवक स्थिर; दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह...
परभणीत कोबी प्रतिक्विंटल ४०० ते ८००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
खानदेशातील सोयाबीन आवक घटलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५८०...सांगली ः येथील बाजार समितीच्या आवारात दिवाळी...
सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...