agriculture news in Marathi, green chili at 300 to 500 rupees in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३०० ते ५०० रुपये
राजकुमार चौगुले
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला.

गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. ओल्या वटाण्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. ओल्या वटाण्याला दहा किलोस  ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. 

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला.

गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. ओल्या वटाण्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. ओल्या वटाण्याला दहा किलोस  ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. 

गेल्या सप्ताहापासून भाजीपाला बाजारात मोठी अस्वस्थता आहे. याचा परिणाम या सप्ताहातही पाहावयास मिळाला. दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला काढणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतातच नष्ट करण्यास प्रारंभ केल्याने स्थानिक ठिकाणाहून होणाऱ्या आवकेत घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोबी, टोमॅटो, फ्लॉवरची स्थानिक भागातून होणारी आवक पंचवीस टक्‍क्यांपर्यंत घटली होती. बेळगाव भागातून मात्र भाजीपाल्याची नियमित आवक सुरू आहे. 

कोथिंबिरीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही घट होती. मेथीची दररोज तीन ते पाच हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर होता. फळांमध्ये द्राक्षाची दररोज वीस ते पंचवीस बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस २० ते २५ रुपये दर होता. अननसाची नव्वद ते शंभर डझन आवक झाली. अननास डझनास ५० ते ४५० रुपये दर मिळाला. 

या सप्ताहात गुळाच्या आवकेत घट झाली. गुळाची दररोज सरासरी पाच हजार रव्यांची आवक झाली. दर मात्र गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर होते. गुळास क्विंटलला ३००० ते ४००० रुपये किंवटल इतका दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...