agriculture news in Marathi, green chili and mutter rates increased in kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात हिरवी मिरची, मटार तेजीत
राजकुमार चौगुले
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला. 

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला. 

बाजार समितीत वांग्याची दोनशे तीस करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस  १०० ते २८० रुपये दर होता. गेल्या दोन महिन्यांपासून वांग्याचे वाढलेले दर अपवाद वगळता कायम होते. गेल्या आठ दिवसांपासून वातावरण काहीसे निरभ्र झाल्याने भाजीपाला उत्पादकांच्यात काहीसे समाधान पसरले आहे. वातावरणात बदल झाला असला तरी अद्याप उष्णता कायम असल्याने भाजीपाल्यावरील कीड कमी होत नसल्याची माहिती भाजीपाला उत्पादकांनी दिली.

ढोबळी मिरचीच्या आवकेतही अनियमिता आहे. ढोबळी मिरचीची दररोज दोनशे ते अडीचशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर बहुतांशी भाजीपाल्याचे दर दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका राहिला. 

कोथिंबिरीच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र होते. कोथिंबिरीची दररोज वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक झाली. परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कोथिंबिरीची लागवड केली. यामुळे ही कोथिंबीर आता बाजार समितीत येत आहे. यामुळे कोथिंबिरीचे दर तेजीत स्थिर राहू शकत नसल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. या सप्ताहात कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही मोठी वाढ झाली. मेथीची आवकही दहा हजार पेंढ्यांच्या वर सातत्याने राहिली. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. 

सांगली भागातून अर्ली द्राक्षाच्या आवकेत सुरवात झाली आहे. ही आवक नियमित नसली तरी एक दोन दिवसाआड तीस ते पन्नास बॉक्‍स द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षास किलोस ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. येत्या पंधरवड्यात द्राक्षाच्या आवकेत चांगली वाढ होण्याची शक्‍यता फळबाजाराच्या सूत्रांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...