agriculture news in Marathi, green chili and soybean rates increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात हिरवी मिरची, सोयाबीनचे दर वाढले
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात हिरवी मिरची, चवळी व धान्यात सोयाबीनमध्ये तेजीचा कल दिसून आला. सोयाबीनची आवक कमी राहिली. हिरव्या मिरचीसह चवळीची आवकही घटल्याची माहिती मिळाली. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात हिरवी मिरची, चवळी व धान्यात सोयाबीनमध्ये तेजीचा कल दिसून आला. सोयाबीनची आवक कमी राहिली. हिरव्या मिरचीसह चवळीची आवकही घटल्याची माहिती मिळाली. 

सोयाबीनची प्रतिदिन ४०० क्विंटल आवक झाली. तेवढी आवक झाली. सोयाबीनचे दर २७०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन २० क्विंटल होती. तिला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर होता. चवळीची आवक प्रतिदिन दोन क्विंटल, अशी होती. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाल शेंगेला प्रतिक्विंटल १२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला.

कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम कांदा उत्पादकांसाठी दिसून आला. कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३५० रुपयांची सुधारणा झाली. त्याचे मागील दोन दिवसांतील दर १५०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे राहिले. त्याची आवक प्रतिदिन ४२५ क्विंटल राहिली. मूग, उडदाच्या दरातही क्विंटलमागे १५० रुपयांनी सुधारणा झाली. डाळमिलकडून मागणी वाढल्याने उडदाचे व्यापारी ते डाळमिलचालक, असे सौदे झाले. उडदासह मुगाची किरकोळ, अशी आवक बाजार समितीत झाली. 

मेथी, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो यांची आवक कायम राहिली. मेथीला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल ४०० ते ११०० रुपये दर होता. मेथीची आवक प्रतिदिन १० क्विंटल, तर कोथिंबिरीची आवक प्रतिदिन आठ क्विंटल, अशी होती. टोमॅटोची आवक प्रतिदिन २० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर होता. 
कोबीची प्रतिदिन २१ क्विंटल एवढी आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये दर होता. पपईची शनिवारी अधिकची आवक झाली. तिला ४०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर होता. पेरू, डाळिंबासह बोरांची आवक कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...