agriculture news in marathi, green chili costly for picking, Maharashtra | Agrowon

मिरची झाली तोडणीलाही महाग
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 सप्टेंबर 2018

या वर्षी मी १३ एकरांत मिरची लागवड केली अाहे. माझ्या गावात ६० ते ७० एकरांत मिरची अाहे. मिरचीच्या व्यवस्थापनाचा खर्च खूप वाढलेला असून, एकरी फवारणीचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये लागतो. गेले तीन महिने या पिकासाठी हजारोंचा खर्च झाला अाहे. अाता मिरची काढायला सुरवात झाली तर अवघे पाच ते सहा रुपयांचे दर मिळत अाहेत. 
- हेमंत देशमुख, मिरची उत्पादक, डोंगरकिन्ही, जि. वाशीम

अकोला : या मोसमात लागवड केलेल्या हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, सुरवातीलाच दर गडगडलेले असल्याने उत्पादकांना तोडणीचा खर्चही महाग झाल्याची स्थिती अाहे. हिरवी मिरची ठोकमध्ये अवघी ५ ते ६ रुपये किलो दराने व्यापारी मागत अाहेत. मागील २० दिवसांपासून हे दर असल्याचे शेतकरी सांगत अाहेत.

पावसाळ्यात हिरव्या मिरचीची रोपे लावणी करून अाॅगस्ट-सप्टेंबरमध्ये यातील माल निघणे सुरू होत असतो. सध्या मिरचीची काढणी सुरू झाली अाहे. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत दर खूपच कमी मिळत अाहेत. दरांमध्ये जवळपास दुप्पट-तिप्पट तफावत अाहे.

पावसाळ्यात हिरवी मिरची लागवड करून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न काढतात. मिरचीला असलेली मागणी पाहता दरही बऱ्यापैकी मिळत असतात. या वर्षी इतर पिकांप्रमाणेच मिरचीच्या दरातही घसरण झाली अाहे. अवघा पाच ते सहा रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना कुठल्याच परिस्थिती परवडणारा नाही. तोडणीसाठी मजुरीचा दरसुद्धा अधिक अाहे. सध्या तापमान वाढलेले असून, या परिस्थितीत पाण्याची गरज वाढली अाहे. मात्र विजेची समस्यासुद्धा शेतकऱ्यांना अधिक त्रस्त करीत अाहे. तासनतास वीजपुरवठा बंद राहत अाहे. अशाही स्थितीत शेतकरी नेमकेच सुरू झालेले हे मिरचीचे पीक वाचवण्यासाठी मेहनत घेत अाहेत. मात्र अातापर्यंत खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती बनलेली अाहे.

इतर अॅग्रो विशेष
कडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...
भारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...
मुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...
खरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...
सरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...
नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...
दुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....
नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...
वाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...
लढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...