agriculture news in Marathi, Green chili, mutter rates increased in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात हिरवी मिरची, मटार वधारले
राजकुमार चौगुले
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, मटारच्या दरात तेजी कायम होती. हिरव्या मिरचीस दहा किलोस १७० ते ३०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज दोनशे तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची चारशे ते पाचशे पोती आवक होती. ओल्या वटाण्यास दहा किलोस २८० ते ३५० रुपये दर मिळाला. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, मटारच्या दरात तेजी कायम होती. हिरव्या मिरचीस दहा किलोस १७० ते ३०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज दोनशे तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची चारशे ते पाचशे पोती आवक होती. ओल्या वटाण्यास दहा किलोस २८० ते ३५० रुपये दर मिळाला. 

गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोची दीड हजार क्रेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस  ३० ते ९० रुपये दर होता. कारल्याची चाळीस ते पन्नास पोती आवक झाली. कारल्यास दहा किलोस  २५० ते ३०० रुपये दर होतात. वांग्याच्या आवकेत काहीशी घट झाली. वांग्यास दहा किलोस १६० ते ३०० रुपये दर मिळाला. गाजराची दीडशे पोती आवक झाली. गाजरास दहा किलोस ७० ते २१० रुपये दर मिळाला. 

कोथिंबिरीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १०० ते ५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली आहे. यामुळे दरात फारशी तेजी नाही. हीच परिस्थिती मेथीचीही राहिली. मेथीची दररोज पंधरा ते सतरा हजार पेंढ्या आवक होत्या. मेथीस शेकडा  १०० ते ३०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा आदी भाज्यांना शेकडा २०० ते ३०० रुपये दर मिळाला.

 फळांमध्ये द्राक्षाच्या आवकेत वाढ झाली. द्राक्षास दररोज शंभर ते दीडशे बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १५ ते २५ रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहापासन द्राक्षास मिळणारे दर हे स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. फळामध्ये सोलापूर भागातून बोरांची दररोज ऐंशी ते शंभर पोती आवक झाली. बोरास किलोस  ५ ते १५ रुपये दर मिळाला. पुणे भागातून अंजिराचे  पंचवीस बॉक्‍स आवक झाले. अंजिरास किलोस ५० ते ७० रुपये दर होता.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...