राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते २८०० रुपये

राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते २८०० रुपये
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते २८०० रुपये

कोल्हापुरात प्रतिदहा किलो १०० ते ३०० रुपये कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या मिरचीची सातशे ते आठशे पोती आवक होत आहे. ओल्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत मिरचीचा दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत बहुतांशी बेळगाव बरोबरच गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातून मिरचीची आवक होत आहे. यंदा मिरचीचे पीक चांगले असले तरी उत्पादन जास्त होत असल्याने दरात फारशी वाढ नसल्याचे उत्पादकांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच दर यंदा हिरव्या मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना मिळत आहे. यामुळे मिरचीचे दर सातत्याने जास्तीत जास्त ३०० ते ४०० रुपये दहा किलोपर्यंत रहात असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. यंदा आवकेतही वीस ते पंचवीस टक्क्‍यांपर्यंत वाढ आहे. अकोल्यात प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये अकोला  येथील भाजी बाजारात हिरवी मिरची १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जात अाहे. दररोज पाच टनापेक्षा अधिक अावक होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांकडून मिळाली. गेल्या काही दिवसांपासून अावक वाढत अाहे. येथील बाजारात नागपूर, मराठवाडा व स्थानिक जिल्ह्यांमधून मिरचीची अावक होत असते. हंगामात ही अावक सध्या अाहे त्यापेक्षा अाणखी वाढलेली राहते. सध्या मिरचीची काढणी सर्वत्र सुरू झालेली अाहे. यामुळे बाजारातील दर साधारण मिरचीला १२०० ते १५०० दरम्यान अाणि चांगल्या दर्जाच्या मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विटंलपर्यंत मिळत आहे. किरकोळ बाजारात मिरचीचा दर ४० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक विकल्या जात अाहे. आवक वाढली तर दरांवर त्याचा परिणाम संभवतो, अशी शक्यताही व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात अाली. परभणीत प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये सध्या स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड, वाडी आदी गावातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ४० ते ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १८०० रुपये दर मिळाले.

भाजीपाला मार्केटमधील आवक दर (क्विंटल-रुपये)

दिनांक आवक किमान कमाल
९  आॅगस्ट ४० १२०० १८००
१६ आॅगस्ट ४० १००० १५००
२३ आॅगस्ट ६० ७०० १३००
३० आॅगस्ट ५० ८०० १५००
६ सप्टेंबर ६० १००० १८००

गुरुवारी (ता. ६) ६० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये होता. तर किरकोळ विक्री ४० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. जळगावात प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये जळगाव : येथील बाजार समितीत महिनाभरापासून मिरचीची आवक स्थिर आहे. सिल्लोड, जामनेर, पाचोरा, एरंडोल भागातून आवक होत आहे.

आवक व दर (प्रतिक्विंटल, रुपयांत)

दिनांक आवक किमान कमाल सरासरी
१६ ऑगस्ट १८ ७५० ११०० १०००
२३ ऑगस्ट २१ ८०० ११५० १०००
३० ऑगस्ट २२ ७०० १२०० ११००
०६ सप्टेंबर २२ ८०० १२०० ११००

गुरुवारी (ता. ६) २१ क्विंटल आवक झाली. किमान ८०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील आठवड्यात प्रतिदिन २२ क्विंटल आवक झाली. पुढे आवक आणखी वाढू शकते, असे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले. पुणे बाजारात दहा किलाेला १५० ते २५० रुपये पुणे (प्रतिनिधी) ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. या वेळी दहा किलाेला १५० ते २५० रुपये एवढा दर हाेता. 

आवक (क्विंटल) आणि दर पुढीलप्रमाणे

दिनांक आवक  दर 
५ अाॅगस्ट ४६० १६००-२५०० 
४ अाॅगस्ट ४७२ १६००-३०००
३ अाॅगस्ट ८८२ १०००-२०००
२ अाॅगस्ट ८७५ १५००-३०००

बाजार समितीमध्ये हिरवी मिरचीची आवक ही आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि आेरिसा येथनू हाेत असते. तर स्थानिक आवक ही केवळ ४ ते ५ टेम्पाे एवढी असते, अशी माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.  औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ५०० ते ९०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ६) हिरव्या मिरचीची १११ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला  ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ ऑगस्टला हिरव्या मिरचीची ८५ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ ऑगस्टला १९५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ ऑगस्टला १०३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २१ ऑगस्टला १३९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ ऑगस्टला १४२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचा दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ ऑगस्टला हिरव्या मिरचीची आवक ८१ क्‍विंटल तर दर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सांगलीत प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये सांगली : येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरच्यांची १०० ते १५० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील शिवाजी मंडईत मिरचीची आवक कमी अधिक होऊ लागली आहे. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यांतून मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. ५) मिरचीची १५० ते २०० पोत्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. ४) मिरचीची १५० ते २०० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होतो. नगरला प्रतिक्विंटल १००० ते २८०० रुपये ​नगर : नगर बाजार समितीत आज (गुरुवारी) ३०.९२ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल एक १००० ते २८०० रुपये आणि सरासरी १९०० रुपये दर मिळाला. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण २५ ते ४५ क्विंटलपर्यंत आवक होत असते. ३० ऑगस्टला ३३.२१ क्‍विंटल मिरचीची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६२० रुपये दर मिळाला. २३ ऑगस्टला ४०.६३ क्विटंलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६२० रुपये दर मिळाला. १६ ऑगस्टला ३२.४६ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते दोन हजार पाचशे व सरासरी दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर मिळाला. ७ ऑगस्टला ३७.५० क्विंटलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार दोनशे व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. तर २ ऑगस्टला २७.२० क्विंटलची आवक होऊन एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे व सरासरी दोन हजार हजार रुपये दर मिळाला. सध्या बाजार समितीत बऱ्यापैकी भाजीपाला, मिरचीची आवक होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com