agriculture news in Marathi, Green chili rates increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon

हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणा
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 23 जानेवारी 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत गत सप्ताहात घट होऊन दरात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली. आवक दिवसाला २१ क्विंटल राहिली. मागील पंधरवड्यात हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ४० क्विंटलपर्यंत होती. गत सप्ताहाच्या सुरवातीलाच आवकेत घट व्हायला सुरवात झाली. आवक कमी झाल्याने दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली. दर १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.
 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत गत सप्ताहात घट होऊन दरात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांनी वाढ झाली. आवक दिवसाला २१ क्विंटल राहिली. मागील पंधरवड्यात हिरव्या मिरचीची आवक प्रतिदिन ४० क्विंटलपर्यंत होती. गत सप्ताहाच्या सुरवातीलाच आवकेत घट व्हायला सुरवात झाली. आवक कमी झाल्याने दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ झाली. दर १५०० ते ३००० व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले.
 

मेथीची आवक प्रतिदिन १० क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची आवक प्रतिदिन १० क्विंटल राहिली. तिला ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याची प्रतिदिन ३०० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२५० ते ३००० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक प्रतिदिन १८ क्विंटल राहिली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते ३००० रुपये दर मिळाला. भेंडीच्या दरातही सुधारणा झाली.

टोमॅटोची प्रतिदिन आवक २५ क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ३५० ते ७०० रुपये दर मिळाला. बटाट्याची प्रतिदिन आवक २०० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाला. वांग्यांची प्रतिदिन आवक ३० क्विंटल होती. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते ११०० रुपये दर मिळाला. कोबीची आवक प्रतिदिन १५ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाला.

वाटाण्याची आवक प्रतिदिन २० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. पालकची आवक प्रतिदिन चार क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १५०० रुपयांपर्यंत दर होता. गिलक्‍यांची आवक प्रतिदिन अडीच क्विंटल होती. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर होता. 

सोयाबीन, तुरीच्या दरांचा गोंधळ मात्र कायम होता. सोयाबीन दरात सुधारणा झालेली असली, तरी अधिक दर शेतकऱ्यांना मिळत नव्हते. तर तूर उत्पादकांनाही हमीभावापेक्षा कमीच दर मिळत होते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

केळीचे दर टिकून
केळीच्या दरात झालेली वाढ टिकून आहे. कांदेबाग केळीला प्रतिक्विंटल ११२५ रुपये व ऑनचे दरही मिळत आहेत. मागील १० - १२ दिवसांत थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे केळी परिपक्व होण्याची प्रक्रिया वाढली असून, पुढील महिन्यात आवक वाढू शकते. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही केळीचे दर १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून होते.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...