कोल्हापुरात हिरवी मिरची वधारली

मिरची
मिरची

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वटाणा, हिरव्या मिरचीचे दर तेजीत राहिले. ओल्या वाटाण्यास दहा किलोस १६० ते ३६० रुपये दर होता. तर हिरव्या मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. वांगी, ढोबळी मिरचीचे दर स्थिर होते. वांग्यास दहा किलोस ५० ते २०० तर ढोबळी मिरचीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर होता. बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची पाचशे ते सहाशे क्रेट आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ५० रुपये दर मिळाला. कारल्याच्या आवकेत मोठी घट होती. कारल्यची दररोज पंधरा ते वीस पोती इतकीच आवक झाली. कारल्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता. दोडक्‍याची दररोज पंचवीस ते तीस पाट्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर होता. गेल्या महिन्यापासून गाजराच्या आवकेत सातत्य आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाजराची एक हजार पोत्यापर्यंत आवक झाली. आता ही आवक पाचशे पोत्यांवर आली असली, तरी दररोजची आवक कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले गाजरास दहा किलोस १०० ते १६० रुपये दर होता.  पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १०० ते ४०० रुपये दर होता. मेथीची दररोज पाच ते सात हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा २०० ते ५०० रुपये दर होता. कांदापातीस शेकडा ६०० ते ७०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेन मेथी, कोथिंबिरीच्या दरात विशेष वाढ झाली नाही. दर स्थिरच असल्याचे भाजीपाला विभागातून सांगण्यात आले.  द्राक्षाची दररोज दीडशे ते दोनशे बॉक्‍स आवक होती. सांगली, तासगाव भागांतून द्राक्षाची आवक सुरू होती. द्राक्षास किलोस २० ते ३५ रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com