agriculture news in Marathi, Green chili rates up in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीत
राजकुमार चौगुले
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गवारीचे दर तेजीत राहिले. हिरव्या मिरचीस दहा किलोस १८० ते ३०० ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते २५० तर गवारीस दहा किलोस ३०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. ओल्या मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीची केवळ दहा ते पंधरा पोती इतकीच आवक झाली.

कोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी मिरची, ढोबळी मिरची, गवारीचे दर तेजीत राहिले. हिरव्या मिरचीस दहा किलोस १८० ते ३०० ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते २५० तर गवारीस दहा किलोस ३०० ते ३५० रुपये इतका दर मिळाला. ओल्या मिरचीची दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीची केवळ दहा ते पंधरा पोती इतकीच आवक झाली.

भेंडी, वरणा दोडका आदी भाजीपाल्यांचे दर दहा किलोस १०० ते २५० रुपये इतके स्थिर राहिले. गाजरास दहा किलोस १०० ते २२० रुपये दर होता. गेल्या सप्ताहात गाजराची आवक पाचशे ते सातशे पोती इतकी होती.

संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी असल्याने गेल्या आठवड्यात गाजराची आवक जिल्ह्याबरोबरच सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातूनही झाली होती. यंदाच्या सप्ताहात ती आवक कमी झाली. या सप्ताहात गाजराची आवक तीनशे पोत्याच्या आसपास होती. शेवगा शेंगेची दररोज पन्नास ते सत्तर पोती आवक होती. शेवगा शेंगेस दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता.

गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर होती. कोथिंबीरीची दररोज पंधरा ते सतरा हजार पेंढ्या इतकी आवक होती. कोथिंबीरीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाला. मेथीची पंधरा हजारच्या आसपास आवक राहिली. मेथीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. 

पालक, पोकळा, शेपूस १०० ते २०० रुपये दर मिळाला. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची चांगली आवक सुरू झाली आहे. दररोज तीनशे ते चारशे बॉक्‍स द्राक्षे तासगाव भागातून दाखल होत आहे. द्राक्षास किलोस १० ते ३५ रुपये दर मिळत असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...