नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात वाढ

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात वाढ
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात वाढ

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक ३२६८ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ५४००  ते ६०००, तर ज्वाला मिरचीला ५००० ते ५५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली, तसेच परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक  २२४१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४८०० ते ५५०० दर मिळाला, तर घेवड्याला ४५०० ते ७५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ८३५४ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

भुईमुगाच्या शेंगांची आवक १७०३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ३५०० असा दर मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक ३०७७२ क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते १३०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ६८१३ क्विंटल झाली. बाजारभाव ६०० ते १२०० प्रतिक्विंटल होते.

टोमॅटोला १०० ते ६५०, वांगी १३० ते ३५०, फ्लॉवर ७० ते १४० असे प्रति १४ किलोस दर मिळाले, तर कोबी ६० ते १४० असा प्रति २० किलोस दर आहे. ढोबळी मिरची १४० ते २१० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ६० ते १८०, कारले ३०० ते ५५०, गिलके २०० ते ४५०, भेंडी १४५ ते ३०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १७५ ते ३७५, लिंबू ५०० ते ९००, दोडका ४०० ते ९२५ असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ६५० ते ३९००, मेथी १७०० ते ३८००, शेपू १२०० ते ३२००, कांदापात ११६० ते ३६००, पालक १९० ते ४७०, पुदिना २१० ते ३६० असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५०२१ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ६२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्याची आवक २१३९ क्विंटल झाली. लालबाग २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल, बदाम आंब्यास २००० ते ५००० प्रतिक्विंटल तर केशर आंब्यास ४००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी झाली. 

टरबुजाची आवक २३२० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. खरबुजाची आवक ३४५ क्विंटल झाली. बाजारभाव ९०० ते २४०० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक २४० क्विंटल झाली. बाजारभाव २५०० ते ४५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक १४० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com