सोलापुरात हिरवी मिरची, गवार, वांग्याचे दर वधारले
सुदर्शन सुतार
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

गेल्या दोन महिन्यांपासून गवार, वांगी, हिरवी मिरचीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिले. पण या सप्ताहात त्यांच्या दरात आणि मागणीत काहीशी वाढ झाली. घेवड्यालाही या सप्ताहात चांगलाच उठाव मिळाला.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, वांग्याला मागणी राहिली. त्यांचे दरही वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात गवारची रोज १० ते १५ क्विंटल, वांग्याची ३५ ते ४० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक राहिली,  ही सगळी आवक  स्थानिक भागातूनच झाली. पण मागणी चांगली असल्याने त्याला उठावही मिळाला. गवारला प्रतिदहा किलोसाठी १७० ते ४२५ व सरासरी २५० रुपये दर राहिला. वांग्याला १०० ते ४०० व सरासरी २०० रुपये आणि हिरव्या मिरचीला ८० ते ३०० व सरासरी १५० रुपये असा दर मिळाला.

गेल्या दोन महिन्यांपासून गवार, वांगी, हिरवी मिरचीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिले. पण या सप्ताहात त्यांच्या दरात आणि मागणीत काहीशी वाढ झाली. घेवड्यालाही या सप्ताहात चांगलाच उठाव मिळाला. घेवड्याची आवक रोज किमान ५ ते ७ क्विंटल राहिली. घेवड्याला प्रतिदहा किलोसाठी २५० ते ४०० व सरासरी ३५० रुपये असा दर राहिला. भाज्यांच्या दरातील तेजी या सप्ताहातही टिकून होती. विशेषतः कोथिंबिरीचे दर चांगलेच तेजीत होते. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १८०० रुपये, मेथीला १००० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याच्या दरात सुधारणा
कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. कांद्याची आवक मुख्यतः स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक तुलनेने कमी राहिली. रोज सरासरी ४० ते ६० गाड्या इतकी आवक  झाली. पण कांद्याला मागणी राहिल्याने दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते २७०० व सरासरी १२०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...